वृद्धेवर बलात्कार करून हत्या, आरोपींना मुंबईतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:59 AM2018-05-15T05:59:08+5:302018-05-15T05:59:08+5:30

पश्चिम बंगालमध्ये ६४ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करून तिची हत्या करून मुंबईत आलेल्या दोन आरोपींना एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

The old man was raped and raped by the accused | वृद्धेवर बलात्कार करून हत्या, आरोपींना मुंबईतून अटक

वृद्धेवर बलात्कार करून हत्या, आरोपींना मुंबईतून अटक

Next

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ६४ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करून तिची हत्या करून मुंबईत आलेल्या दोन आरोपींना एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोविंद सरकार (२८), शुभंकर सिखदर (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये बिगारी काम करत असलेल्या आरोपींनी १० मे रोजी कोलकाता, हावडामार्गे मुंबई गाठली. नादिया जिल्ह्यातील कुपर कॅम्प परिसरात रेल्वे रुळांलगतच्या झोेपडपट्टीमध्ये ते राहतात. सरकार हा कुलाबा येथील बड्या हॉटेलमध्ये सफाई कमागर म्हणून काम करायचा. तीन वर्षांपूर्वीच तो नोकरी सोडून पश्चिम बंगालला गेला, तर खार येथील हॉटेलमध्ये नोकरीस असलेल्या शुभंकरने तीन महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती.
पश्चिम बंगालमध्ये बिगारी काम करताना दोघांची ओळख झाली. ७ मे रोजी रेल्वेमार्गालगत दोघेही पार्टी करत बसले होते. त्यानंतर ते येथील घराबाहेर हात धुण्यासाठी गेले असता ६४ वर्षीय महिलेशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर शुभंकरने महिलेला मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध पडली. याच संधीचा फायदा उठवत दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर तिने बचावासाठी आरडाओरड सुरू केली. पकडले जाण्याच्या भीतीने दोघांनी तिचा गळा आवळून हत्या केली.
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील राणाघाट पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने त्यांनी मुंबई गाठली. खबऱ्यांमार्फत ही बाब एमआरए मार्ग पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने छत्रपती शिवाजी मार्ग टर्मिनस येथील रिगल सिनेमा परिसरात सापळा रचून दोघांनाही अटक केली. दोघांकडे केलेल्या चौकशीत बलात्कार झाल्याचेही उघड झाले.
या प्रकरणी राणाघाट पोलिसांना कळविण्यात आले आहे.

Web Title: The old man was raped and raped by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.