डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३, मृतांमध्ये चार महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:24 AM2019-07-18T05:24:38+5:302019-07-18T05:24:54+5:30

डोंगरी येथे चार मजली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा बुधवारी १३ झाला

The number of dead in the hillariasaha 13, four women in the dead | डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३, मृतांमध्ये चार महिला

डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३, मृतांमध्ये चार महिला

Next

मुंबई : डोंगरी येथे चार मजली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा बुधवारी १३ झाला असून, जखमींचा आकडा ९ झाला आहे. १३ मृतांमध्ये ४ महिला तर ९ पुरुषांचा समावेश आहे. जखमींमध्ये ६ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंगरी येथील केसरबाई ही चार मजली इमारत मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास कोसळली. बुधवारी संध्याकाळपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू असतानाच दुर्घटनेतील मृतांचा आकडा १० झाला.
केसरबाई इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई पालिकेचे शंभर कामगार, जेसीबी, साहाय्यक आयुक्त आणि इतर यंत्रणा दाखल झाली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांसह एनडीआरएफचे जवानही मदतीला धावून आले. शिवाय स्थानिकांची मदत होतच होती. मंगळवारपासून सुरू असलेले ढिगारा उपसण्याचे काम अखेर बुधवारी संध्याकाळी थांबवण्यात आले. तरीही येथे एक रुग्णवाहिका तसेच अग्निशमनची गाडी तैनात ठेवण्यात आली आहे.
> घटनाक्रम
बुधवारी सकाळी ५.३० : ढिगाऱ्यातून तिघांना बाहेर काढत
जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव कार्यात अनिल केंडे
हे अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी सकाळी ६.१२ : हरबाज इद्रीसी आणि शहजाद इद्रीसी यांचा जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला. अलीमा इद्रीसी यांची प्रकृती स्थिर आहे.
बुधवारी सकाळी ८.१० : इसराल यमीन मसुरी यांचा जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला.
>मृतांची नावे :
जावेद इस्माईल (३४), सादिया नासीर शेख (२५), अब्दुल सतार कालु शेख (५५), मुझामिल मन्सुर सलमानी (१५), सायरा रिहान शेख (२०), अरदान शेहजाद जरीवाला (२७), कश्यप्पा अमीराजान (१३), सना सलमानी (२५), झुबेर मन्सुर सलमानी (२०), इब्राहीम (१.६), हरबाज इद्रीसी (७), शहजाद इद्रीसी (८), इसराल यमीन मसुरी (५४)
>जखमींची नावे -
फिरोज सलमानी, झीनत मोहसीन सलमानी, नसरा मोहसीन सलमानी, अब्दुल रेहमान शेख, नावेद सलमानी, इम्रान हुसेन कलवानी,
सलमा अब्दुल सतार शेख, साजीदा शहजाद जरीवाला, अलीमा बानु इद्रीसी,
एक अनोळखी चिंचोळ्या गल्ल्यांमुळे मानवी साखळीच्या मदतीने येथील बचाव कार्य सुरू असतानाच ढिगाºयातून बाहेर काढण्यात येत असलेल्या प्रत्येकाला रुग्णवाहिकेद्वारे तातडीने उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्याचे काम दहाहून अधिक रुग्णवाहिकांद्वारे सुरू होते. बचावकार्यात कुठेही अडथळा येणार नाही; याची काळजी प्रत्येक यंत्रणेकडून घेतली जात होती.

Web Title: The number of dead in the hillariasaha 13, four women in the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.