धक्कादायक! घटस्फोटासाठी पतीनेच पत्नीला दिली नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, नागपाडयातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:40 AM2017-12-12T01:40:39+5:302017-12-12T08:02:07+5:30

एका मुस्लीम पतीने पत्नीचे नग्न फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत घटस्फोटाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार आर्थिक राजधानी मुंबईत समोर आला आहे.

Nude photo threatens viral, Nagappada incident, filed against husband | धक्कादायक! घटस्फोटासाठी पतीनेच पत्नीला दिली नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, नागपाडयातील घटना

धक्कादायक! घटस्फोटासाठी पतीनेच पत्नीला दिली नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, नागपाडयातील घटना

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : तिहेरी तलाकवरील बंदीनंतर कायद्याच्या कचाट्यात अडकण्याच्या भीतीने, एका मुस्लीम पतीने पत्नीचे नग्न फोटो काढत, ते व्हायरल करण्याची धमकी देत, घटस्फोटाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार आर्थिक राजधानी मुंबईत समोर आला आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरूकेला आहे.
आग्रीपाडा परिसरात राहणाºया तक्रारदार सायरा (नावात बदल) यांचा २०१३ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर ती नागपाडा परिसरात पती आणि मुलीसोबत राहते. लग्नाच्या काही वर्षांनंतर पतीकडून तिचा मानसिक, तसेच शारीरिक छळ सुरू झाला. तिहेरी तलाकवरील बंदीमुळे तलाक देणे शक्य नाही. म्हणून पतीने कायदेशीर घटस्फोटासाठी सायराकडे आग्रह धरला. त्यासाठी तो तिला रोज शिवीगाळ करत मारझोड करू लागला. मात्र, मुलीच्या भवितव्यासाठी ती त्याचे अत्याचार निमूटपणे सहन करत होती.
रविवारी त्याने पत्नीला मारझोड करत नग्न केले व तिचे फोटो काढले. ‘घटस्फोट दे नाही, तर नग्न फोटो व्हायरल करेन,’ अशी धमकी सायराला दिली. मात्र, तिचा नकार कायम असल्याने त्याने मुलीसह तिला घराबाहेर काढले.
पत्नीने थेट माहेर गाठून पतीच्या विकृतीला वाचा फोडली. माहेरच्यांच्या मदतीने आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, आग्रीपाडा पोलिसांनी पतीविरुद्ध मानसिक, तसेच शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी नागपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Nude photo threatens viral, Nagappada incident, filed against husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा