आता ई-कचराही स्वतंत्र गोळा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:29 AM2018-02-20T06:29:06+5:302018-02-20T06:29:09+5:30

ओला कच-याबरोबरच सुका कचराही एकत्रच डम्पिंग ग्राउंडवर जात असल्याने महापालिकेची वर्गीकरणाची मोहीम अडचणीत आली होती.

Now e-waste will be collected separately | आता ई-कचराही स्वतंत्र गोळा होणार

आता ई-कचराही स्वतंत्र गोळा होणार

googlenewsNext

मुंबई : ओला कच-याबरोबरच सुका कचराही एकत्रच डम्पिंग ग्राउंडवर जात असल्याने महापालिकेची वर्गीकरणाची मोहीम अडचणीत आली होती. त्यात ई-कच-याच्या समस्येने भर घातल्याने अखेर पालिका प्रशासनाला आपली चूक सुधारावी लागली आहे. त्यानुसार आता सुका कचरा वेगळा वाहून नेण्याची व्यवस्था करण्याची अटच पुढील सात वर्षांच्या कंत्राटात घालण्यात आली आहे. यामध्ये सुका कचºयाबरोबरच ई कचºयासाठीही वाहनांमध्ये दहा टक्के जागा राखून ठेवण्यात येणार आहे.
मुंबईतून दररोज सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा गोळा करून देवनार, मुलुंड व कांजूरमार्ग या डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. डंपिंग ग्राऊंडची मर्यादा संपत आल्याने मुंबईत कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे महापालिकेने सुका व ओला कचºयाचे वर्गीकरण व ओला कचºयावर सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया करण्याची सक्ती केली
आहे.
मात्र प्रत्यक्षात सुका कचरा वाहून नेण्यासाठी सक्षम यंत्रणाच पालिकेकडे उपलब्ध नव्हती. यामुळे या मोहिमेलाच हरताळ फासली जात होती. हा अडथळा दूर करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वेगळा केलेला सुका कचरा स्वतंत्रपणे वाहून नेण्यासाठी पालिकेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.
नव्याने सात वर्षांसाठी मागविलेल्या निविदांमधील कंत्राटात या अटीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुका कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी लहान आणि मोठ्या कॉम्पॅक्टर्समध्ये त्या वाहनांच्या आकारमानाच्या ९० टक्के जागा ओल्या कचºयासाठी तर सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्यासाठी दहा टक्के जागा राखून ठेवण्यात येणार आहे.

असा जाईल ई-कचरा...
मोठे कॉम्पॅक्टर्स - सहा मेट्रिक टन
साईटलोडिंग कॉम्पॅक्टर्स - सहा मेट्रिक टन
लहान कॉम्पॅक्टर्स - अडीच मेट्रिक टन
लहान बंद वाहने ०.६ मेट्रिक टन कचरा

देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे सुका व ओला कचरा वर्गीकरण मोहीम पालिकेने सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक इमारतीचा सुका आणि ओला कचरा एकत्र न होता एकाच वाहनातून वेगवेगळा वाहून नेण्याची सोय उपलब्ध
होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा वर्गीकरणाची सवय लागून डम्पिंग ग्राऊंडवरील भार कमी होईल, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.

ओला व सुका कचरा स्वतंत्र वाहून नेण्यासाठी ४६ वाहने पुरविण्यात आली होती. ही संख्या आता ९४ पर्यंत नेण्यात आली आहे.

Web Title: Now e-waste will be collected separately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.