घाटकोपर विमान दुर्घटना, सीबीआय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:22 AM2018-08-08T05:22:29+5:302018-08-08T05:23:20+5:30

घाटकोपर विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे.

Notice to Ghatkopar plane crash, CBI, Civil Aviation Ministry | घाटकोपर विमान दुर्घटना, सीबीआय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला नोटीस

घाटकोपर विमान दुर्घटना, सीबीआय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला नोटीस

Next

मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआय व नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला मंगळवारी नोटीस बजावली.
न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी सीबीआय, हवाई वाहतूक मंत्रालयाला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. २८ जूनला यूव्ही एव्हिएशनच्या किंग एअर-९० या एअरक्राफ्टचा अपघात होऊन ते घाटकोपर येथे कोसळले. यात एअरक्राफ्टमधील चार कर्मचारी व एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले यशवंत शेणॉय यांनी याचिकेद्वारे केली आहे.

Web Title: Notice to Ghatkopar plane crash, CBI, Civil Aviation Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.