नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ३४१ जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:01 AM2018-02-06T02:01:39+5:302018-02-06T02:01:41+5:30

विनापरवाना, नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांना अन्नपदार्थ विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील कलम ५८ नुसार तो दंडनीय अपराध आहे.

Notice to 1,341 people for violation of rules | नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ३४१ जणांना नोटिसा

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजार ३४१ जणांना नोटिसा

Next

मुंबई : विनापरवाना, नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांना अन्नपदार्थ विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील कलम ५८ नुसार तो दंडनीय अपराध आहे. अशा गुन्ह्यास दोन लाखापर्यंत दंड होऊ शकतो, या प्रकारच्या नोटीसा अन्न व औषध प्रशासन विभागाने शहर-उपनगरातील १ हजार ३४१ अन्न पदार्थ वितरक व घाऊक विक्रेत्यांना पाठविल्या आहेत.
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न परवाना प्रदान करण्यात येतो. सर्व अन्न उत्पादक, पुरवठादार, वितरक, घाऊक विक्रेते यांना फक्त अन्न परवाना/ नोंदणी धारक पेढीसच अन्न पदार्थ विक्री करणे कायद्यातील परवान्यानुसार बंधनकारक आहे. जे विक्रेते, पुरवठादार, वितरक , घाऊक विक्रेते विनापरवाना अथवा विनानोंदणी व्यावसायिकाला अन्न पदार्थांची विक्री/पुरवठा करतील त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तरी सर्व उत्पादक, पुरवठादार, वितरक, घाऊक विक्रेते यांनी परवानाधारक अन्न व्यावसायिकालाच अन्न पदार्थांची विक्री करावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी केले आहे.

Web Title: Notice to 1,341 people for violation of rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.