तगडा उमेदवारच नाही, तरी हाती मुंबईची जागा; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

By दीपक भातुसे | Published: April 10, 2024 12:18 PM2024-04-10T12:18:41+5:302024-04-10T12:19:28+5:30

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Not a strong candidate, but Mumbai seat in hand; Discontent among Congress workers | तगडा उमेदवारच नाही, तरी हाती मुंबईची जागा; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

तगडा उमेदवारच नाही, तरी हाती मुंबईची जागा; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

दीपक भातुसे  
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे तगडा उमेदवार असलेली सांगलीची जागा उद्धवसेनेला दिल्याने आणि काँग्रेसकडे जिथे सशक्त उमेदवार नाही अशी उत्तर मुंबईची जागा घेतल्याने काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

उत्तर मुंबईत काँग्रेसचे संघटन मजबूत नसल्याने ही जागा उद्धवसेनेला देण्यात यावी, अशी मागणी जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मात्र, सांगलीची जागा गेल्याने आपली पत राखण्यासाठी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी उमेदवार नसतानाही ही जागा आपल्याकडे घेतली.

सूत्रांनी सांगितले की, उत्तर मुंबईतील जवळपास २५ पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना मेल करून ही जागा उद्धवसेनेला देण्याची मागणी केली होती. उत्तर मुंबईत अस्लम शेख हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. त्यांनीही ही जागा उद्धवसेनेला द्यावी, अशी भूमिका मांडली होती. मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धवसेनेच्या विनोद घोसळकरांनी काँग्रेसकडून लढावे, असा प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवला. ठाकरेंनी घोसाळकरांना फोन करून नाना पटोलेंशी बोलणेही करून दिले. मात्र, पटोलेंची ऑफर घोसाळकर यांनी नाकारली.  

काँग्रेसकडे उमेदवार नव्हता, म्हणून उत्तर मुंबईतील स्थानिक नेत्यांचा मला लढण्यासाठी आग्रह होता. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीच माझे नाव पक्षाकडे सुचवले होते. त्यामुळे मला पक्षाने तयारी सुरू ठेवायला सांगितले होते. 
- विनोद घोसाळकर, नेते, उद्धवसेना

Web Title: Not a strong candidate, but Mumbai seat in hand; Discontent among Congress workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.