असा झालाच नाही कुणी, दीनांचा धनी, भीमसैनिकांच्या मनोबलापुढे ‘ओखी’ही फिके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:21 AM2017-12-07T02:21:30+5:302017-12-07T02:21:37+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यास चैत्यभूमीवर येणाºया अनुयायींनी पुन्हा एकदा आपल्या मनोबलाचे दर्शन संपूर्ण जगाला करून दिले.

No such thing happened, the wealth of the poor, the ocean of the bhimasikikano 'Okhi' also the fate! | असा झालाच नाही कुणी, दीनांचा धनी, भीमसैनिकांच्या मनोबलापुढे ‘ओखी’ही फिके!

असा झालाच नाही कुणी, दीनांचा धनी, भीमसैनिकांच्या मनोबलापुढे ‘ओखी’ही फिके!

Next

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यास चैत्यभूमीवर येणाºया अनुयायींनी पुन्हा एकदा आपल्या मनोबलाचे दर्शन संपूर्ण जगाला करून दिले. ‘ओखी’ वादळाचा धोका आणि पावसाची रिपरिप अशा असंख्य संकटांवर मात करत, देशाच्या कानाकोपºयातून लाखो भीमसैनिकांनी बुधवारी दादरमध्ये निळे वादळ दाखविले़
दादर चौपाटीवरील बंदी आणि शिवाजी पार्कमध्ये पावसामुळे झालेल्या चिखलामुळे अनुयायींची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, या सर्व शंका-कुशंका फोल ठरवत, अनुयायींनी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अनुयायींना महापालिका शाळांत हलविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. त्यात प्रशासनाने बांधलेला स्टेज ‘ओखी’च्या वादळामुळे कोसळल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, रात्रभर येणाºया गर्दीला पाहता, ‘ओखी’ची भीती फिकी पडल्याचे दिसू लागले.
दादरमधील ध्वनिप्रदूषण टाळण्याच्या विनंतीला मान देत, लाउडस्पीकरच्या मर्यादित वापराने अनुयायींसह स्वयंसेवकांनी एका नव्या संकल्पनेला चालना दिल्याचे दिसले. या ठिकाणी लागलेल्या पुस्तक, झेंडे, टी-शर्ट, बॅच, गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या मूर्ती, यामुळे संपूर्ण दादर आंबेडकरमय झाले होेते.
स्वयंसेवकांची फौज
शिवाजी पार्कमध्ये आलेल्या लोकांच्या व्यवस्थेसाठी आणि शाळा महाविद्यालयांमध्ये थांबलेल्या अनुयायींसाठी स्वयंसेवक होते़

पालिकेवर नाराजी
हवामान खात्याने पावसाचा इशारा दोन दिवस अगोदरच दिलेला असतानाही पालिका प्रशासनाने बाबासाहेबांच्या देशभरातून आलेल्या अनुयायांची नीट व्यवस्था केली नाही. शेवटच्या
क्षणी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यवस्था केली, परंतु तेथे शौचालये आणि पाण्याची व्यवस्था अपुरी होती. अभिवादनानंतर परतीच्या प्रवासाला लागलेल्या अनुयायांनी जाता-जाता स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

देशभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येतात, परंतु यंदा ‘ओखी’ वादळामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पडणाºया अवकाळी पावसामुळे चैत्यभूमीवरील पुस्तक
विक्रीवर परिणाम झाला.

मंगळवारी झालेल्या पावसाने पुस्तक विक्रेत्यांच्या स्टॉल्सवरील अनेक पुस्तके भिजली. बुधवारी अनेक पुस्तक विक्रेत्यांनी स्टॉल्स लावलेच नाहीत. दादर परिसरात यंदा दरवर्षीपेक्षा पुस्तकांचे खूपच कमी स्टॉल्स पाहायला मिळाले. ५ आणि ६ डिसेंबर रोजी दादर पश्चिमेकडील शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीकडे जाणाºया सर्व रस्त्यांवर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, बाबासाहेबांवरील पुस्तकांना तुफान मागणी असते.

पावसामुळे मोजकेच स्टॉल्स खुले
बाबासाहेबांच्या चरित्रासह महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित साहित्यांचे असंख्य स्टॉल्स असतात. भीमसैनिकदेखील येथे मोठ्या प्रमाणात फोटो, गंडे आदी साहित्य घेणे पसंत करतात, परंतु यंदा अवकाळी पावसामुळे खूप कमी स्टॉल लागले होते, तर काही पुस्तक विक्रेत्यांनी टेम्पोमधूनच पुस्तक विक्री सुरू ठेवली होती. इंदू मिल परिसरात हाताच्या बोटावर मोजण्याइतके पुस्तकांचे स्टॉल्स पाहायला मिळाले.

दादर (पश्चिम) स्थानकांच्या बाहेर ७ अधिकारी व ७० पोलीस हवालदारांचा ताफा तैनात करण्यात आलेला होता, तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे भीम अनुयांयींनी चोख पालन केले. त्यामुळे वाहतूकदेखील सुरळीत चालू होती.

मूर्तींच्या स्टॉल्सवरही परिणाम
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या मूर्तींचे अनेक स्टॉल्स चैत्यभूमी परिसरात लावलेले असतात, परंतु मंगळवारी काही स्टॉल्सवरील मूर्ती भिजल्या. त्यामुळे बुधवारी मूर्तींचे स्टॉल्सही कमी प्रमाणात लावण्यात आले होते. मूर्ती भिजू नये, यासाठी स्टॉल्स धारकांना अनेक कसरती कराव्या लागत होत्या.

शिवाजी पार्क सुने-सुने
महापरिनिर्वाण दिनासाठी देशभरातून येणाºया अनुयायींची शिवाजी पार्क येथे व्यवस्था करण्यात येते. दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये लाखोंच्या संख्येने अनुयायी जमतात, परंतु पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल झाला होता. लोकांसाठी तयार केलेल्या अनेक शेड पाऊस आणि वाºयामुळे पडल्यामुळे बुधवारी शिवाजी पार्कमध्ये मोजकेच अनुयायी दिसले.

मैदानामधील ‘कक्ष’ बंद
शिवाजी पार्क मैदानात विविध संस्थांनी आणि खासगी कंपन्यांनी अनुयायींसाठी मदत कक्ष, जनसंपर्क कक्ष, आरोग्य कक्ष उभारले होते, परंतु वादळ आणि पावसामुळे हे कक्ष बंद करण्यात आले होते. काही कक्षांमध्ये अधिकारी, कार्यकर्तेच नव्हते.

जगातील असा कोणताही महामानव नव्हता आणि नाही आहे की, ज्यांच्यापश्चात लाखो-करोडोंच्या संख्येने अनुयायी कोणीही न बोलाविता अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येत असतात. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या घटनेमुळे विविधता असलेला भारत देश एक झाला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये या घटनेतून देण्यात आलेली आहेत व ही मूल्ये आणि तत्त्वे संपूर्ण भारतीयांनी स्वीकारली पाहिजेत. त्यामुळे सामाजिक परिवर्तन होऊन प्रांतवाद, धर्मवाद, जातीयवाद बंद होईल. लोकशाहीच्या मार्गाने भारत देश चालत आहे. त्याचे कारण फक्त बाबासाहेब आहेत. बाबासाहेब हे कोणत्या एका धर्माचे, जातीचे नेते नसून, संपूर्ण देशाचे, जगाचे नेते आहेत.
- राजू वाघमारे, अध्यक्ष,
काँग्रेस अनुसूचित जाती विभाग

Web Title: No such thing happened, the wealth of the poor, the ocean of the bhimasikikano 'Okhi' also the fate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.