आणखी मानधनवाढ मिळणार नाही! सरकार तूर्त तरी ठाम; आंदोलकांची आज पंकजा मुंडेंशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 03:21 AM2017-09-26T03:21:33+5:302017-09-26T03:21:42+5:30

राज्यातील ९७ हजार अंगणवाडी सेविका आणि तेवढ्याच मदतनीस आणि १२ हजार मिनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसंदर्भात महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे या मंगळवारी आंदोलक कृती समितीच्या पदाधिका-यांशी चर्चा करणार आहेत.

No more bliss! The government is still firm; Agitators today talk to Pankaja Mundane | आणखी मानधनवाढ मिळणार नाही! सरकार तूर्त तरी ठाम; आंदोलकांची आज पंकजा मुंडेंशी चर्चा

आणखी मानधनवाढ मिळणार नाही! सरकार तूर्त तरी ठाम; आंदोलकांची आज पंकजा मुंडेंशी चर्चा

Next

मुंबई : राज्यातील ९७ हजार अंगणवाडी सेविका आणि तेवढ्याच मदतनीस आणि १२ हजार मिनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसंदर्भात महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे या मंगळवारी आंदोलक कृती समितीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहेत. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता तसेच आधीच मानधनवाढ केलेली असल्याने मंगळवारी चर्चेत आणखी मानधनवाढीची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे.
आघाडीच्या सरकारने २०१४ मध्ये जाता जाता अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली, तसा जीआर काढला होता; पण अंमलबजावणी केली नाही. भाजपा सरकारमध्ये हे खाते पंकजा मुंडे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी अंमलबजावणी केली होती. गेल्या आठवड्यात अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजारांवरून ६ हजार ५०० करण्यात आले. मदतनिसांचे मानधन २५०० रुपयांवरून ३५०० करण्यात आले आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ३२५० रुपयांवरून ४ हजार ५०० केले. शिवाय भाऊबीजेची रक्कम १ हजार रुपयांवरून २ हजार केली. या घोषणेनंतर काही संघटनांनी संप मागे घेतला, मात्र बहुसंख्य संघटना अजूनही संपावरच आहेत.
अंगणवाडी सेविकांना १०,५०० रुपये मासिक मानधन देण्याची कृती समितीची मागणी आहे. शेतकरी कर्जमाफीसह इतर बाबींचा राज्याच्या तिजोरीवरील भार लक्षात घेता जेवढे देता येईल तेवढे दिले, असे महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागण्यांसाठी सेविकांनी बालकांना वेठीस धरले असून काही माध्यमांना हाताशी धरून आंदोलन सुरू असल्याचीही टीका होत आहे.

पोषण आहार वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप
राज्यभरात संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपात फूट पाडण्यासाठी प्रकल्प अधिकाºयांकडून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारी केला आहे. कंत्राटदाराला हाताशी घेऊन प्रकल्प अधिकारी पोषण आहार वाटपाचा बनाव सादर करत असल्याचे निमंत्रक एम.ए. पाटील यांनी सांगितले.

Web Title: No more bliss! The government is still firm; Agitators today talk to Pankaja Mundane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई