विजेच्या भारनियमनाचे यंदाच्या उन्हाळ्यात ‘नो टेन्शन’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:26 AM2024-04-08T11:26:59+5:302024-04-08T11:28:24+5:30

‘महानिर्मिती’ने वर्षभरात आठ हजार मेगावॅटपेक्षा अधिकच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांचे नियोजन केले.

no load shedding in this summer mahanirmiti planned renewable energy projects work of more than eight thousand mw in year | विजेच्या भारनियमनाचे यंदाच्या उन्हाळ्यात ‘नो टेन्शन’

विजेच्या भारनियमनाचे यंदाच्या उन्हाळ्यात ‘नो टेन्शन’

मुंबई : ग्राहकांना स्वस्त दरात वीज देण्यासाठी उत्पादनाकरिता प्रयत्न केल्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ‘महानिर्मिती’चे वीज उत्पादन ६१,४३९ दशलक्ष युनिट्स झाले आहे. २०२२-२०२३ मध्ये ५७,७३४ दशलक्ष युनिट्स, अशी ५.९८ टक्के वाढ आणि २०२३-२०२४ मध्ये ६१,४३९ दशलक्ष युनिट्स आणि ७.८५ टक्के वाढ झाल्याचा दावा ‘महानिर्मिती’ने केला आहे.

‘महानिर्मिती’ने वर्षभरात आठ हजार मेगावॅटपेक्षा अधिकच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांचे नियोजन केले. त्यात सौरऊर्जा, तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा, उदंचन जल विद्युत केंद्र, हरित हायड्रोजन प्रकल्पाचा समावेश आहे. 

‘महानिर्मिती’ने २३ संचांसाठी ‘एफजीडी’ यंत्रणा लावण्याचे निश्चित केले आहे. तसेच भुसावळ येथे सौरऊर्जेच्या साहाय्याने २० घनमीटर प्रतितास क्षमतेचा हरित हायड्रोजन प्रकल्प उभारत आहे. याचबरोबर चंद्रपूर येथे ५० दशलक्ष घनमीटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तसेच कोल पाइप कन्व्हेयरद्वारे खाणीतून थेट कोळसा वीज केंद्रात आणण्याची प्रणाली कार्यान्वित झाली असून, कोराडी-खापरखेडा येथे कोल पाइप कन्व्हेअर प्रणाली टप्पा एक सुरू झाला आहे. 

सद्य:स्थितीत औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये २२ लाख मेट्रिक टन कोळसा साठा उपलब्ध असून, मागील वर्षांच्या तुलनेत तीन लाख मेट्रिक टन जास्त कोळसा साठा आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून अधिक वीज उत्पादनाकरिता पुरेसा कोळसा साठा उपलब्ध आहे, असेही ‘महानिर्मिती’कडून सांगण्यात आले.

विजेची निर्मिती (दशलक्ष युनिट्स) -

भुसावळ                           ७,५७५.२३५

चंद्रपूर                              १६,२७९.६६९

पारस                                ३,५९५.९८३

कोराडी                            १३,२००.३०१

खापरखेडा                       ८,२६७.४०९

नाशिक                            २,६४७.३७६

परळी                              ४,१०४.२१६

उरण                               १,७६९.०३२

जल विद्युत प्रकल्प         ३,६६७.८३३

सौरऊर्जा प्रकल्प             ३३२.१०५ 

वीज केंद्रांची कामगिरी-

१) २५० मेगावॅट पारस संच ४ मधून सलग २५८ दिवसांपेक्षा जास्त वीज उत्पादन.

२) ५०० मेगावॅट चंद्रपूर संच क्रमांक ८ मधून २३४ दिवस अखंडित उत्पादन.

३) सात संचांमधून १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस अखंडित वीज उत्पादन. महानिर्मिती’चे औष्णिक वीज उत्पादन ८,४६० मेगावॅट.

Web Title: no load shedding in this summer mahanirmiti planned renewable energy projects work of more than eight thousand mw in year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.