‘हाजी अली’ ट्रस्टविरोधात पर्यावरणहानीचा दावा दाखल, एनजीटीने पाठविली ट्रस्टला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:50 AM2018-01-30T04:50:31+5:302018-01-30T04:50:45+5:30

घनकचरा व्यवस्थापन आणि मलमूत्राची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावल्या प्रकरणी मुंबईतील ‘हाजी अली दरगाह ट्रस्ट’ विरोधात विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे (एनजीटी) तक्रार केली आहे.

NGO filed a complaint against Haji Ali Trust, sent to NGO Trust | ‘हाजी अली’ ट्रस्टविरोधात पर्यावरणहानीचा दावा दाखल, एनजीटीने पाठविली ट्रस्टला नोटीस

‘हाजी अली’ ट्रस्टविरोधात पर्यावरणहानीचा दावा दाखल, एनजीटीने पाठविली ट्रस्टला नोटीस

Next

पुणे : घनकचरा व्यवस्थापन आणि मलमूत्राची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावल्या प्रकरणी मुंबईतील ‘हाजी अली दरगाह ट्रस्ट’ विरोधात विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे (एनजीटी) तक्रार केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने ट्रस्टला नोटीस बजावल्याची माहिती अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली. पुढील सुनावणी ५ मार्च रोजी होणार आहे.
आमिर शेख, वैष्णव इंगोले, रेवती बागडे, श्रद्धा सवाखंडे, राकेश माळी, सुधीर सोनावणे, काजल मांडगे, मैत्रेय घोरपडे आणि दीपक चटप या विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. दर्गा परिसरातल्या घनकचºयाचे अयोग्य व्यवस्थापन, मलमूत्र आणि सांडपाणी विनाप्रक्रिया अरबी समुद्रात सोडले जात असल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत हाजी अली दरगाह विश्वस्त संस्था, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य पर्यावरण विभाग, किनारपट्टी झोन व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई महापालिका, राज्यस्तरीय देखरेख समिती यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
दर्गा परिसरात दररोज फूल आणि चादर वापरून धार्मिक विधी केले जातात. हे ऐतिहासिक धार्मिक स्थळ असून, तेथे गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी चाळीस हजारांहून अधिक व्यक्ती भेट देतात. या परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. चादर आणि फूल दरगाह परिसरात अथवा समुद्रात फेकून दिल्या जातात. दरगाह परिसरातील स्वच्छतागृहातून दररोज ३ हजार लीटरहून अधिक सांडपाणी प्रक्रिया न करताच ते समुद्रात सोडून दिले जाते. त्यामुळे जलचरांना धोका निर्माण झाल्याचे याचिकेत म्हटले आहे.
 

Web Title: NGO filed a complaint against Haji Ali Trust, sent to NGO Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.