३० मिनिटांच्या थरारानंतर नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:40 AM2018-03-17T06:40:39+5:302018-03-17T06:40:39+5:30

बाथरूमला जाते असे सांगून विवाहितेने खिडकीतून बाहेरचा कठडा गाठला. ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी तिला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र ती कुणाचे ऐकत नव्हती.

Newly-married suicide after 30 minutes of thunderstorm | ३० मिनिटांच्या थरारानंतर नवविवाहितेची आत्महत्या

३० मिनिटांच्या थरारानंतर नवविवाहितेची आत्महत्या

Next

मुंबई : बाथरूमला जाते असे सांगून विवाहितेने खिडकीतून बाहेरचा कठडा गाठला. ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी तिला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र ती कुणाचे ऐकत नव्हती. पायपाच्या मदतीने ती आणखी चार मजले वर चढली; आणि ३० मिनिटांच्या या थरारानंतर तिने १४व्या मजल्यावरून खाली उडी घेत आत्महत्या केली. ही घटना ताडदेवमध्ये शुक्रवारी घडली. छाया भुतीया (१९) असे नवविवाहितेचे नाव आहे. तिने मानसिक तणावातून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. मूळची गुजरातची रहिवासी असलेल्या छायाचे दीड महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती ताडदेवच्या एमटी मिल कम्पाउंडमधील गणेश बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावर राहायची. लग्नापासूनच ती तणावात होती. शुक्रवारी पहाटे ४.२०च्या सुमारास ती बाथरूममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडला. छाया तेथे नव्हती. खिडकीही उघडी होती. त्यांनी इमारतीबाहेर धाव घेतली. खाली काही नागरिक वरती पाहत असल्याचे दिसले. त्यांचीच सून खिडकीबाहेरील कठड्यावर बसली होती. ती कुणाचेच ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. काही जण खिडकीतून येत असल्याचे समजताच तिने पायपाच्या साहाय्याने १४वा मजला गाठला आणि ४.५०च्या सुमारास खाली उडी घेतली.
>घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात तिने मानसिक तणावातून हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्नामुळे ती अस्वस्थ होती का? सासरच्यांकडून तिला त्रास होता का, याबाबत ताडदेव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Newly-married suicide after 30 minutes of thunderstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू