पेंग्विनच्या सोबतीला येणार नवे पाहुणे; राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:28 AM2018-02-10T03:28:33+5:302018-02-10T03:28:40+5:30

परदेशी पाहुण्यांनी मुंबईकरांना विशषत: बच्चे कंपनीला भुरळ पाडली आहे. राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनच्या भेटीला लवकरच आणखी काही नवीन पाहुणे मुक्कामासाठी येत आहेत. या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर, उद्यानही तयार होत असल्याने राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार आहे.

Newcomers to come along with Penguins; The queen's garden will return to the old glory | पेंग्विनच्या सोबतीला येणार नवे पाहुणे; राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार

पेंग्विनच्या सोबतीला येणार नवे पाहुणे; राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार

Next

मुंबई : परदेशी पाहुण्यांनी मुंबईकरांना विशषत: बच्चे कंपनीला भुरळ पाडली आहे. राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनच्या भेटीला लवकरच आणखी काही नवीन पाहुणे मुक्कामासाठी येत आहेत. या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर, उद्यानही तयार होत असल्याने राणीच्या बागेचे जुने वैभव परतणार आहे.
सिंगापूरस्थित झेराँग पार्कच्या धर्तीवर मुंबईतील भायखळास्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण सुरू आहे. यासाठी १२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण कोरियातून हेम्बोल्ट जातीचे ८ पेंग्विन मुंबईत आणण्यात आले. यापैकी एका पेंग्विनच्या मृत्यूमुळे प्राणिसंग्रहालयाची मान्यताच धोक्यात आली होती. मात्र, पेंग्विनला पाहण्यासाठी दररोज राणीबागेत उसळणाºया गर्दीने सर्वांची तोंडे बंद केली.
त्यामुळे दुसºया टप्प्यात महापालिकेने आणखी काही देशी व परदेशी पाहुण्यांना आणण्याची तयारी केली आहे. या प्राण्यांसाठी १७ पिंजरे तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर, या प्राण्यांना राणीच्या बागेत आणण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राणीच्या बागेत सीसीटीव्हीची नजरही असणार आहे.

सीसीटीव्हीचा वॉच
राणीच्या बागेत परदेशी पाहुण्यांच्या आगमनानुळे पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र, आधीच ३ पाळ्यांत ७० कामगार बागेत देखरेखीसाठी तैनात आहेत, परंतु हा वॉच चौफेर राहण्यासाठी महापालिकेने ५३ एकर असलेल्या या जागेत तीनशे सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल ५ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, पब्लिक अड्रेस सीस्टम बसविण्यात येणार आहे.

असे आहेत नवीन पाहुणे : कोल्हा, पाणमांजर, लांडगा, देशी अस्वल, मद्रास पाँड कासव, तरस, मांजर संकुल, बिबट्या, सर्प, वाघ, सिंह, सांबर, काकर, नीलगायी, चौशिंगा, काळवीट.

गांडूळखत प्रकल्प
प्राणिसंग्रहालयाच्या आवारात निर्माण होणाºया सेंद्रिय कचरा उपयोगात आणण्यासाठी, विद्यमान गांडूळखत प्रकल्पाची २ कोटी २० लाख रुपये इतक्या खर्चाने दर्जोन्नती करण्यात येणार आहे.

लँडस्केप : प्राणिसंग्रहालयातील विद्यमान उद्यान कार्यालय पाडून, त्या ठिकाणी लँडस्केप उद्यानाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ८० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.

Web Title: Newcomers to come along with Penguins; The queen's garden will return to the old glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई