चार वर्षांत ‘सीएसएमटी’ला नवे रूपडे; स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 09:07 AM2023-11-24T09:07:13+5:302023-11-24T09:07:25+5:30

या प्रकल्पासाठी १८१३ कोटींचा खर्च होणार असून, अनेक नावीन्यपूर्ण बदल केले जाणार आहेत.

New look for 'CSMT' in four years; Redevelopment of the station is underway | चार वर्षांत ‘सीएसएमटी’ला नवे रूपडे; स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू

चार वर्षांत ‘सीएसएमटी’ला नवे रूपडे; स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. या कामातून रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटणार असले तरी हे काम पूर्ण होण्यासाठी किमान ३ ते ४ वर्षे वाट पाहावी लागणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्यासाठी या स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने हाती घेतले आहे.   

या प्रकल्पासाठी १८१३ कोटींचा खर्च होणार असून, अनेक नावीन्यपूर्ण बदल केले जाणार आहेत. यामध्ये सौर ऊर्जा, जलसंवर्धन यांसारखे पर्यावरणाला हातभार लावणारे उपक्रमदेखील सहभागी असणार आहेत. अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम निविदा मे.अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स (इंडिया) लिमिटेड, नवी दिल्ली यांच्याकडून कामाला सुरुवात झाली असून, एकूण २,४५० रुपये कोटी गुंतवणुकीसाठी खर्च असणार आहे.

ही कामे झाली पूर्ण
 साइट ऑफिस सेटअप 
 ड्रोन सर्वेक्षण, जीपीआर (ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार) सर्वेक्षण, बॅरिकेडिंगचे काम, माती तपासणी, आणि साइटच्या कामांची जमवाजमव 
 जागा सर्वेक्षण, हवाई सर्वेक्षण आणि जीटीआय (जिओटेक्निकल टेस्टिंग आणि इन्स्पेक्शन) प्लॅटफॉर्म क्र. १८ पूर्ण ट्रॅफिक अकाउंट्स बिल्डिंग, नवीन प्रशासकीय इमारत, जुनी अनेक्स बिल्डिंग, पार्सल ऑफिस बिल्डिंग, आणि पीएफ नंबर १८ साइडसाठी इन्व्हेंटरी तपशील संकलित केले जात आहेत.
 किनाऱ्यावर खड्डे टाकण्याचे काम, युटिलिटी सर्वेक्षण आणि तात्पुरते कार्यालय स्थलांतरण इतर कामे प्रगतीपथावर

असे होणार काम
कामाच्या व्याप्तीमध्ये डीआरएम कॉम्प्लेक्स (तळमजला  ४), विश्रामगृहे (तळमजला   २), प्रवासी-संबंधित किरकोळ इमारती, पार्सल इमारती, यांत्रिकी विभागाच्या इमारती, लांब-अंतर आणि उपनगरीय नोड्स आणि कॉन्कोर्सेसचे बांधकाम समाविष्ट आहे. पादचारी पूल, स्कायवॉक, हेरिटेज नोड (तळमजला    ४) येथे मध्य रेल्वेचे नवीन मुख्यालय, संपूर्ण छताचे नूतनीकरण, फिरत्या भागांचा विकास, हेरिटेज इमारतींचा जीर्णोद्धार, लँडस्केपिंग, कलाकृती, बॅलेस्टलेस ट्रॅक आणि सीमा भिंती यांचा समावेश आहे.

Web Title: New look for 'CSMT' in four years; Redevelopment of the station is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.