‘नेतन्याहू गो बॅक!’, इस्रायलच्या पंतप्रधानांना विरोध, काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 02:18 AM2018-01-16T02:18:22+5:302018-01-16T02:18:26+5:30

भारत दौ-यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंझामीन नेतन्याहू यांचा मुंबईत ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे.

'Netanyahu Go Back!', A warning to show Israel's Prime Minister, black flags | ‘नेतन्याहू गो बॅक!’, इस्रायलच्या पंतप्रधानांना विरोध, काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

‘नेतन्याहू गो बॅक!’, इस्रायलच्या पंतप्रधानांना विरोध, काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

Next

मुंबई : भारत दौ-यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंझामीन नेतन्याहू यांचा मुंबईत ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. पॅलेस्टाइनची जागा बळकावून त्यावर इस्रायलची स्थापना करणे अनैतिक असल्याचा आरोप करत अनेक विचारवंतांनी इंडिया पॅलेस्टाइन सॉलीडॉरिटी फोरमच्या नेतृत्वाखाली १८ जानेवारीला आझाद मैदानात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. तर रझा अकादमीने मोहम्मद अली मार्गावरील मिनारा मशिदीजवळ सोमवारी निदर्शने करत ‘नेतन्याहू गो बॅक’च्या घोेषणा दिल्या.
यासंदर्भात रझा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी सांगितले की, रझा अकादमीसह आॅल इंडिया सुन्नी जमात उल उलेमा, रहेमानी ग्रुप, मुस्लीम कौन्सिल यांनी या निदर्शनांत सहभाग घेतला होता. लहान मुलांची कत्तल करणाºया पंतप्रधानांचे महाराष्ट्रात स्वागत होता कामा नये. तसे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसांत देणार आहे. तरीही नेतन्याहू महाराष्ट्रात आले, तर त्यांना काळे झेंडे दाखवून लोकशाही मार्गाने मुस्लीम समाज आपला रोष व्यक्त करेल.

Web Title: 'Netanyahu Go Back!', A warning to show Israel's Prime Minister, black flags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.