नेपाळच्या तरुणीवर दिल्लीत सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 13:14 IST2019-05-14T11:53:35+5:302019-05-14T13:14:36+5:30

नेपाळहून मुंबईला निघालेल्या तरुणीला प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं महागात पडलं आहे. तरुणीवर चार जणांनी दिल्लीच्या द्वारका परिसरात सामूहिक बलात्कार केला आहे.

Nepali woman gang-raped in Delhi | नेपाळच्या तरुणीवर दिल्लीत सामूहिक बलात्कार

नेपाळच्या तरुणीवर दिल्लीत सामूहिक बलात्कार

ठळक मुद्देनेपाळहून मुंबईला निघालेल्या तरुणीला प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं महागात पडलं आहे. तरुणीवर चार जणांनी दिल्लीच्या द्वारका परिसरात सामूहिक बलात्कार केला आहे. मुंबईत आल्यावर तिने ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - नेपाळहून मुंबईला निघालेल्या तरुणीला प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं महागात पडलं आहे. तरुणीवर चार जणांनी दिल्लीच्या द्वारका परिसरात सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी मुंबईत आल्यावर तिने ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सुमी (नावात बदल) ही 22 वर्षीय तरुणी मुंबईत राहणाऱ्या तिच्या भावाला भेटण्यासाठी नेपाळहून दोन दिवसांपूर्वी निघाली होती. नेपाळहून दिल्लीला ती बसने आली. तिला तिथून मुंबईत जाणारी लोकल पकडायची होती मात्र तिला प्लॅटफॉर्मवरच उशीर झाला. त्यावेळी एका व्यक्तीने तिची चौकशी सुरू केली. उशीरा रात्री प्लॅटफॉर्मवर राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत तो तिला सोबत द्वारका परिसरात घेऊन गेला. त्याठिकाणी सुमीवर त्या व्यक्तीसह चौघांनी बलात्कार केला असे तिने ओशिवरा पोलिसांना सांगितल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

सुमीने कशीबशी मुंबईत जाणारी लोकल पकडली आणि गोरेगावच्या भगतसिंगनगर परिसरात राहणाऱ्या तिच्या भावाकडे पोहोचली. घडलाप्रकार तिने भावाला सांगितला आणि त्याने तिला ओशिवरा पोलीस ठाण्यात नेले. ओशिवरामध्ये झीरो झीरोवर गुन्हा दाखल करत सुमीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे अहवालात सिद्ध झाल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे. ओशिवरा पोलिसांनी सुमीचा जबाब नोंदवला असुन हे प्रकरण आता पुढील चौकशीसाठी संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. याप्रकरणी विचारण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवर यांना संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

 

Web Title: Nepali woman gang-raped in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.