अर्नाळ्याच्या पर्यटनाची इमेज बदलण्याची आवश्यकता

By admin | Published: April 10, 2015 12:12 AM2015-04-10T00:12:25+5:302015-04-10T00:12:25+5:30

येथील निसर्गरम्य अशा पर्यटना क्षमतेचा पुरेपूर लाभ उठवायचा असेल तर त्यासाठी वन-डे पिकनिक स्पॉट अशी जी इमेज येथील पर्यटनाला लाभली आहे.

The need to change the image of Aranye tourism | अर्नाळ्याच्या पर्यटनाची इमेज बदलण्याची आवश्यकता

अर्नाळ्याच्या पर्यटनाची इमेज बदलण्याची आवश्यकता

Next

अर्नाळा : येथील निसर्गरम्य अशा पर्यटना क्षमतेचा पुरेपूर लाभ उठवायचा असेल तर त्यासाठी वन-डे पिकनिक स्पॉट अशी जी इमेज येथील पर्यटनाला लाभली आहे. ती बदलण्याची आवश्यकता आहे.
आजही अर्नाळा बीच म्हटला की, सकाळी जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. अशीच कल्पना सगळ्या पर्यटकांच्या मनात आहे. ती बदलण्याची गरज आहे. त्यासाठी एका दिवसापेक्षा जास्त दिवसाची टूर कशासाठी आखावी आणि त्यात कोणत्या सुविधा द्याव्यात याचा विचार व्हायला हवा. सध्या बीचवरील लाटांशी खेळणे आणि रिसॉर्टमध्ये काही काळ विसावणे हे सोडले तर येथे आणखी काय करण्यास वाव आहे, हे पर्यटकांना माहित नाही. त्यामुळे वसई दर्शन किंवा वसई टूर अशी पॅकेज टूर किंवा कंडक्टेड टूर आखण्याची आवश्यकता आहे.
त्यामध्ये रॉक क्लायबिंग, रॅपलिंग, हायकिंग, जॉगिंग यावर आधारीत इव्हेंट आयोजित करणे ज्याला अ‍ॅडव्हेंचर टुरिझम म्हणता येईल आणि दुसऱ्या टूरमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक अशा स्थळांच्या दर्शनाची टूर आयोजित करता येईल. यामध्ये वज्रेश्वरी, वसईचा किल्ला, अर्नाळा, आसपासचे काही बीच व अन्य स्थानांचा समावेश करता येईल. यामध्ये पहिला दिवस जलक्रीडेचा, दुसरा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टसचा आणि तिसरा साईट सिर्इंगचा अशी तीन दिवसाची टूर काढता येईल. त्यासाठी सर्व रिसॉर्ट मालकांनी एकत्र येऊन मिनी बसेस भाड्याने घेतल्या तर त्यांचा वापर या कंडक्टेड टूरसाठी करता येईल. वसईच्या आसपास जी धरणे आहेत त्यामध्ये जलपर्यटन करता येईल. या दृष्टीकोनातून सामूहिक प्रयत्न झाले तर वसईची वन-डे पिकनिक स्पॉट ही प्रतिमा बदलेल व त्याला लाँगर टुरिझम डेस्टीनेशनचे स्वरुप प्राप्त होईल. कालांतराने येथे हाऊस बोट देखील तैनात करता येईल. त्याचप्रमाणे फिशिंग बोट सफारी आयोजित करून मच्छिमारी नौकेवर अर्धा किंवा पूर्ण दिवस कसा घालवता येईल, या दृष्टीने नियोजन करता येईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The need to change the image of Aranye tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.