नवरीच्या मैत्रिणीने चोरला ७ लाखांचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 05:48 AM2019-05-29T05:48:05+5:302019-05-29T05:48:07+5:30

वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून नवरीच्या मैत्रिणीने ७ लाख किमतीचा हार चोरी केल्याची घटना रविवारी घडली.

Nawari's girlfriend thief lost 7 lakhs | नवरीच्या मैत्रिणीने चोरला ७ लाखांचा हार

नवरीच्या मैत्रिणीने चोरला ७ लाखांचा हार

Next

मुंबई : वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून नवरीच्या मैत्रिणीने ७ लाख किमतीचा हार चोरी केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी लग्नात आलेल्या मेघा पंजाबी या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. ती एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.
लग्नाची तयारी सुरूअसताना नवरीने तिचा हार मैत्रिणीला दाखवला आणि बॅगेत ठेवला. काही वेळाने नवरी मेकअप रूममध्ये गेली तेव्हा हार गायब असल्याचे लक्षात येताच तिला धक्का बसला.
सगळीकडे शोध सुरू केला. मात्र हार सापडला नाही. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी गोंधळ सुरू झाला. अखेर, महिलेने वांद्रे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
पोलिसांनी सुरुवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मेकअप रूममध्ये सीसीटीव्ही नसल्याने, आरोपीपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक होते. अखेर, संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी मंगळवारी मेघा पंजाबीला अटक केली आहे. तिच्याकडून हार हस्तगत करण्यात आला आहे. हार पाहून तो तिच्या मनात भरला. त्यामुळे तिने तो चोरल्याचे पोलिसांना सांगितले.

Web Title: Nawari's girlfriend thief lost 7 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.