Native environment in western countries for education: Pranab Mukherjee | शिक्षणासाठी पाश्चिमात्य देशांत पोषक वातावरण - प्रणव मुखर्जी
शिक्षणासाठी पाश्चिमात्य देशांत पोषक वातावरण - प्रणव मुखर्जी

मुंबई : पाश्चिमात्य देशांमधील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षणासाठी आपल्या देशापेक्षा अधिक पोषक वातावरण आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. सातव्या डॉ. एम. विश्वेश्वरैया स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.
सोमवारी कफ परेड येथील एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष कमल मोरार्का, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उपाध्यक्ष शरद उपासनी आणि विजय कलंत्री, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे कार्यकारी संचालक वारेरकर या वेळी उपस्थित होते.
प्रणव मुखर्जी म्हणाले की, पाश्चिमात्य देशांमधील शिक्षणसंस्था तेथील विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रूची निर्माण होईल, यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्याकडे त्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारतामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावतोय, तो अधिक उंचावण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवे. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा देशात १२ टक्के साक्षरता होती. आज
भारतात साक्षरतेचे प्रमाण वाढून
७४ टक्के इतके झाले आहे. हा
टप्पा गाठण्यासाठी ७० वर्षे
लागली.
डॉ. एम. विश्वेश्वरैया यांच्या आठवणींना उजाळा देताना
मुखर्जी म्हणाले की, विश्वेश्वरैया हे देशाचे श्रेष्ठ पुत्र आहेत, त्यांनी देशाची बांधणी करताना स्वत:चे आयुष्य वेचले. त्यांनी राबविलेल्या नदीजोड प्रकल्पांमुळे अनेक खेड्यांमध्ये पाणी पोहोचले. मैसुरचे दिवाण असताना त्यांनी बंगळुरू कृषी विद्यापीठ, मैसूर साबण कारखाना, स्टेट बँक आॅफ मैसूर, मैसूर आयर्न अँड स्टील
वर्क्ससारख्या कंपन्या आणि संस्थांची स्थापना करून रोजगार उपलब्ध
करून दिले.


Web Title:  Native environment in western countries for education: Pranab Mukherjee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.