400वरून 44वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय; मोदींचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 12:31 PM2018-06-26T12:31:56+5:302018-06-26T12:44:39+5:30

आणीबाणी आणि महाभियोग चालवण्याची कृती ही एकाच मानसिकतेतून आलेली आहे.

narendra modi criticize on congress | 400वरून 44वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय; मोदींचा काँग्रेसला टोला

400वरून 44वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय; मोदींचा काँग्रेसला टोला

मुंबई-  आणीबाणी आणि महाभियोग चालवण्याची कृती ही एकाच मानसिकतेतून आलेली आहे. आणीबाणीच्या काळात काँग्रेसनं संपूर्ण देशाची तुरुंगशाळा केली, गांधी कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला गेला असून, स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याचा आरोपही नरेंद्र मोदींनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आणीबाणीविषयी आयोजित करण्यात आलेल्या विचारमंथनात ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. 400वरून 44वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय, कर्नाटक निवडणुकीनंतर तुम्हाला ईव्हीएम घोटाळा आढळला नाही काय, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.


काय म्हणाले मोदी
- संविधान फक्त पुस्तक नाही तर देशाचं भविष्य, आम्ही संविधान दिवस साजरा केला, काँग्रेसला संविधानाविषयी श्रद्धा नाही
- जनतेच्या नसानसात लोकशाही असल्याचा काँग्रेसला विसर
- काँग्रेस देशाच्या लोकशाहीचा कधीच विचार करत नाही, कारण पक्षातच लोकशाही नाही, संघ, भाजप आणि मोदींच्या नावाने लोकांना घाबरवलं जातं 
- किशोर कुमार यांच्या गाण्यांवरही बंदी घातली, त्यांची काय चूक होती?
- कोणे एके काळी काँग्रेसच्या 400 जागा होत्या, आता 48 राहिल्या 
- आणीबाणी आणि महाभियोग ही एकच मानसिकता, काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात 
- आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाची तुरुंगशाळा केली







Web Title: narendra modi criticize on congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.