मोदी महाराष्ट्रातील कारभारात हस्तक्षेप करत नाहीत- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 01:07 PM2018-04-11T13:07:11+5:302018-04-11T13:07:11+5:30

आमच्या सरकारचा रिमोट कंट्रोल कोणाकडेही नाही, अगदी दिल्लीतही नाही.

Narendra Modi and Amit Shah doesn't interfere in Maharashtra government | मोदी महाराष्ट्रातील कारभारात हस्तक्षेप करत नाहीत- देवेंद्र फडणवीस

मोदी महाराष्ट्रातील कारभारात हस्तक्षेप करत नाहीत- देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील सरकारच्या कारभारात कोणतीही ढवळाढवळ करत नाहीत, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'च्या व्यासपीठावर मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. 

यावेळी त्यांनी फडणवीस सरकारचा रिमोट कंट्रोल कुणाकडे आहे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, आमच्या सरकारचा रिमोट कंट्रोल कोणाकडेही नाही, अगदी दिल्लीतही नाही. भाजपामध्ये अशी पद्धत नाही. तिथे थेट कंट्रोल असतो, रिमोट नसतो. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षात नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यापैकी कुणीही आमच्यावर दबाव टाकला नाही. अमुक गोष्ट करा किंवा करू नका, यासाठी त्यांनी कधी साधा फोनदेखील केला नाही. केवळ केंद्राच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा आग्रह असतो. मोदींचे केवळ एकच सांगणे असते की, पॉप्युलिस्ट राजकारण जरूर करा. पण उगाच नसती आश्वासने देण्याच्या फंदात पडू नका. एका राज्याने अवास्तव घोषणा केल्यास इतर राज्यांवरील दबाव वाढतो, असा विचार त्यामागे असल्याचे फडणवीसांना सांगितले.
 

Web Title: Narendra Modi and Amit Shah doesn't interfere in Maharashtra government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.