नमो चहा नाहीच...

By Admin | Published: May 29, 2016 01:49 AM2016-05-29T01:49:00+5:302016-05-29T01:49:00+5:30

सुशिक्षित बेरोजगारांसाठी राबविण्यात येणारी नमो चहा व फूड स्टॉल्सची योजना अमलात येण्याआधीच वादात सापडली़ या योजनेवर राजकीय चर्चा रंगात येताच भाजपाने घूमजाव करीत

Namo tea is not ... | नमो चहा नाहीच...

नमो चहा नाहीच...

googlenewsNext

मुंबई : सुशिक्षित बेरोजगारांसाठी राबविण्यात येणारी नमो चहा व फूड स्टॉल्सची योजना अमलात येण्याआधीच वादात सापडली़ या योजनेवर राजकीय चर्चा रंगात येताच भाजपाने घूमजाव करीत ही योजना पक्षाची अधिकृत संकल्पना नसल्याचे आज जाहीर केले़ सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांची ही व्यक्तिगत संकल्पना असल्याची भूमिका मांडत भाजपाने या योजनेतून आपले अंग काढून घेतले आहे़
नमो चहा व नमो फूड स्टॉल्सचा प्रस्ताव गंगाधरे यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी मांडला़ ही योजना कशी राबविण्यात येईल, यावर सविस्तर माहिती देणारी पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली़ मात्र शिवसेनेच्या शिववड्याला आव्हान देण्यासाठी ही योजना असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली़ हा तर सरकारी जागेवर अतिक्रमण करण्याचा भाजपाचा डाव
असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला़
अशा उलटसुलट प्रतिक्रिया उमटताच भाजपाने ही योजना आमची नाहीच, असे जाहीर करीत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले़ पंतप्रधानांचे छायाचित्र किंवा नाव कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय योजनेसाठी वापरताना राजशिष्टाचार पाळावा लागतो़ तो शिष्टचार न पाळता ही योजना गंगाधरे यांनी व्यक्तिगत पातळीवर मांडली असल्याचा बचाव भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांनी आज केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Namo tea is not ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.