मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार; ब्रिटिशकालीन नावे होणार इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:57 AM2024-03-13T09:57:28+5:302024-03-13T10:00:31+5:30

एलफिन्स्टन स्टेशनचे नामकरण प्रभादेवी झाल्यानंतर आता आणखी आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी होत आहे.

names of eight railway stations in mumbai will be changed | मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार; ब्रिटिशकालीन नावे होणार इतिहासजमा

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार; ब्रिटिशकालीन नावे होणार इतिहासजमा

मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनचे नामकरण प्रभादेवी झाल्यानंतर आता आणखी आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी होत आहे. या मागणीला अनुसरून करीरोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, चर्नी रोड, काॅटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल, मुंबई सेंट्रल या स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला. याला मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय होऊन केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे द्यावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांची मागणी आहे. 

या स्थानकांचा प्रस्ताव -

करी रोड    लालबाग
सँडहर्स्ट रोड    डोंगरी
मरीन लाइन्स    मुंबादेवी
चर्नी रोड    गिरगाव
कॉटन ग्रीन    काळाचौकी
डॉकयार्ड    माझगाव
किंग्ज सर्कल    तीर्थंकर पार्श्वनाथ
मुंबई सेंट्रल    नाना जगन्नाथ शंकरशेट

Web Title: names of eight railway stations in mumbai will be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.