'म्युझिकची प्रेरणा, पॉपस्टार रिहाना'; हॉलिवूड गायिकेची भेट घेत अमृता फडणवीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:04 PM2024-03-04T12:04:37+5:302024-03-04T12:07:21+5:30

अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याला सिनेजगताबरोबरच, क्रिकेट आणि उद्योगविश्वातील दिग्गज सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं.

'Music's inspiration, popstar Rihanna'; Amrita Fadnavis says about the singer... | 'म्युझिकची प्रेरणा, पॉपस्टार रिहाना'; हॉलिवूड गायिकेची भेट घेत अमृता फडणवीस म्हणतात...

'म्युझिकची प्रेरणा, पॉपस्टार रिहाना'; हॉलिवूड गायिकेची भेट घेत अमृता फडणवीस म्हणतात...

मुंबई - सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लग्नाचा ग्रँड सोहळा जामनगरमध्ये होत असून तीन दिवसांच्या या सोहळ्यात दिग्गजांची मांदियाळी दिसून आली. देश-विदेशातून उद्योगपती, राजकारणी आणि सेलिब्रिटी येथे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्यात गाणं परफॉर्म करुन चार चांद लावले. रिहानाचीही सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ दिसून आली. विशेष म्हणजे गायिका अमृता फडणवीस यांनाही रिहानासोबत फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. 

अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याला सिनेजगताबरोबरच, क्रिकेट आणि उद्योगविश्वातील दिग्गज सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्यात गाणं गाऊन चार चांद लावले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर, पापाराझींना पोझ देताना, महिला पोलिसांना जादू की झप्पी देतानाचेही रिहानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं दिसून आलं. 

 

अंबानींच्या या सोहळ्यात रिहाना बॉलिवूड सेलिब्रिटींवरही भारी पडली. जिकडेतिकडे फक्त रिहानाचीच चर्चा होताना दिसून आले. आधी अंबानीच्या प्री वेडिंगला रिहाना ट्रकभर सामान घेऊन आली होती. त्यानंतर तिच्या परफॉर्मन्सने सगळे थक्क झाले होते. रिहानाने भारतातील चाहत्यांबरोबर केलेल्या कृतीसाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला. विशेष म्हणजे अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये रिहाना झिंगाट गाण्यावरही थिरकली. जान्हवी कपूरने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत जान्हवी आणि रिहाना लोकप्रिय झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. रिहानाचे डान्स मुव्ह्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. दुसरीकडे अमृता फडणवीस यांनीही रिहानासोबतचा फोटो शेअर केला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांनी रिहानासमवेतचा फोटो शेअर करत, Musical Inspiration #rihanna असे म्हणत अमृता यांनी म्युझिक क्षेत्रासाठी रिहाना प्रेरणास्थान असल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी रिहानाने तब्बल ४१ कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे. त्यांचं हे प्री वेडिंग फंक्शन १ ते ३ मार्च दरम्यान पार पडले. त्यानंतर जुलै महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार आहेत. 

 

Read in English

Web Title: 'Music's inspiration, popstar Rihanna'; Amrita Fadnavis says about the singer...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.