मुंबईतील फेरीवाले 1 नोव्हेंबरला धडकणार महापालिकेवर ! कष्टकऱ्यांचीही असते स्टाईल, शशांक राव यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 03:03 PM2017-10-16T15:03:31+5:302017-10-16T15:07:31+5:30

रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधात मुंबई हॉकर्स युनियनने महापालिकेवर 1 नोव्हेंबर रोजी धडक देण्याची घोषणा केली आहे.

Mumbai's hawkers will be hit on November 1! Raj Thackeray's response to Shashank Rao's style is that of the workers | मुंबईतील फेरीवाले 1 नोव्हेंबरला धडकणार महापालिकेवर ! कष्टकऱ्यांचीही असते स्टाईल, शशांक राव यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर  

मुंबईतील फेरीवाले 1 नोव्हेंबरला धडकणार महापालिकेवर ! कष्टकऱ्यांचीही असते स्टाईल, शशांक राव यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर  

Next

मुंबई - रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधात मुंबई हॉकर्स युनियनने महापालिकेवर 1 नोव्हेंबर रोजी धडक देण्याची घोषणा केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत कामगार नेते शशांक राव यांनी धडक मोर्चाची घोषणा केली. रस्त्यावर उद्योग धंदा करण्याचा फेरीवाल्यांना २०१४च्या कायद्यानुसार अधिकार आहे. कायद्याची अंमलबजावणी झाल्यास कुणालाही त्रास होणार नाही. मात्र फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा काढणार आहोत. मात्र तोपर्यंत कायदा हातात घेऊन कुणी आपली स्टाईल दाखवली, तर कष्टकऱ्यांचीही स्टाईल असते, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत यावेळी शशांक राव यांनी फेरीवाला आंदोलनाला हाक दिली आहे.

मनसेचा 15 दिवसांचा अल्टिमेटम

मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 11 ऑक्टोबरला पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. बेकायदा फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची मागणी असल्याचे ठाकरे यांनी आयुक्तांना सांगितले. फेरीवाल्यांमध्ये मराठी माणूस असल्याचे बोलले जाते. मग रस्त्यांवरून चालणारा माणूस मराठी नसतो काय, असा सवालही त्यांनी या भेटीदरम्यान आयुक्तांसमोर उपस्थित केला. एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी संतप्त मोर्चा काढला होता. या दुर्घटनेसाठी अरुंद पुलाइतकेच पादचारी पुलांवर ठाण मांडणारे फेरीवालेही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पदपथ, पूल, रस्ते फेरीवालामुक्त करण्यासाठी त्यांनी महापालिकेला १५ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीप्रमाणे पालिका फेरीवाल्यांवर काय कारवाई करीत आहे? याची माहिती घेण्यासाठी ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात येऊन आयुक्तांची भेट घेतली.

फेरीवाल्यांवर कारवाई करताना अनेकवेळा रेल्वे आणि महापालिकेत हद्दीचा वाद निर्माण होतो. यासाठी आयुक्तांनी रेल्वे महाव्यवस्थापकांबरोबर बैठक घेऊन हद्दीचा वाद सोडवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. यावर दोन्ही प्राधिकरणांची हद्द ठरवून महापालिका आणि रेल्वेच्या माध्यमातून फेरीवाल्यांवर कारवाई करू, अशी हमी आयुक्तांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आयुक्तांकडे मांडलेली संकल्पना रेल्वे महाव्यवस्थापकांकडेही मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नियमित कारवाई करा
महापालिकेच्या कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा त्याच जागी येऊन बसतात. त्यांच्यावर सतत कारवाई केल्यास मुंबई फेरीवालामुक्त करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसहभाग हवा
फेरीवाल्यांचा रोजगार जावा, यासाठी ही मागणी नाही. मात्र करदात्याला रस्त्यांवरून चालता यावे, यासाठी हा लढा आहे. रस्त्यांवर फेरीवाले बसतात म्हणून लोक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करतात.या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग आणि जागरूकता अपेक्षित असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
व्हॉट्सअ‍ॅपवर करा तक्रार
फेरीवाल्यांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर देण्याची मागणी केली असून ती आयुक्तांनी मान्य केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Mumbai's hawkers will be hit on November 1! Raj Thackeray's response to Shashank Rao's style is that of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.