मुंबईकरांनो, सावधान... वनसंपदा घटतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 07:13 AM2018-04-02T07:13:10+5:302018-04-02T07:13:10+5:30

मुंबईत उद्योगधंदे वाढण्यापूर्वी, शहरीकरण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वनसंपदा होती, असे निसर्गपे्रमी आणि पर्यावरणतज्ज्ञ सांगतात, परंतु गेल्या काही दशकांमध्ये मुंबईत विकासाचे कारण पुढे करत, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली गेली. त्यामुळे येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील वातावरणात फरक पडला आहे

 Mumbaikars, be careful ... forests are falling! | मुंबईकरांनो, सावधान... वनसंपदा घटतेय!

मुंबईकरांनो, सावधान... वनसंपदा घटतेय!

Next

- अक्षय चोरगे
मुंबई  - मुंबईत उद्योगधंदे वाढण्यापूर्वी, शहरीकरण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वनसंपदा होती, असे निसर्गपे्रमी आणि पर्यावरणतज्ज्ञ सांगतात, परंतु गेल्या काही दशकांमध्ये मुंबईत विकासाचे कारण पुढे करत, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली गेली. त्यामुळे येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील वातावरणात फरक पडला आहे, जलसाठे कमी झाले आहेत, पक्षी आणि प्राण्यांचे स्थलांतरण होत आहे. वनांचा ºहास झाल्याने बिबट्यांचे मानवी वस्तीत शिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या सर्व गोष्टींना मुंबईतील वनसंपदेचा होणारा ºहास कारणीभूत आहे. विकासकांनी बांधकामादरम्यान वृक्षतोड केली. अनेक ठिकाणी वनक्षेत्रात अतिक्रमण केले. महापालिकेने सातत्याने दुर्लक्ष केल्याने वनांची कत्तल होती गेली. परिणामी, शहरे बकाल झाली. शहरातील वातावरण दिवसेंदिवस न राहण्याजोगे होत आहे. जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत आहे, पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ होत असून, यावर विचार आणि कृती केली नाही, तर विनाश अटळ आहे, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

...तर मुंबईचे
बंगळुरू होईल!
देशातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेने मुंबईत मोठ्या प्रमाणात वृक्षसंख्या होती. खारफुटीचे जंगल होते, परंतु आता त्यांचा ºहास होत आहे. बंगळुरूमध्येदेखील विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल करण्यात आली, त्यामुळे ते शहर उन्हाळ्यामध्ये राहण्यालायक राहिलेले नाही. त्यामुळे मुंबईचे बंगळुरू होऊ देऊ नका, असा इशारा वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी दिला आहे.

फक्त एवढीच वनजमीन शिल्लक...
माहिम येथील महाराष्टÑ नेचर पार्क हा १७ एकरचा भूखंड शासनाने वनजमीन म्हणून घोषित केला आहे. मलबार हिल, पवई तलाव परिसर, जेव्हीएलआर, सीप्झ,
अ‍ॅन्टॉप हिल, मुलुंड आणि चेंबूर या भागांत वनजमिनींचे लहान-लहान तुकडे आहेत, तसेच सायन किल्ला
परिसर (संपूर्ण डोंगर) वनजमीन आहे.

१ हजार हेक्टर वन बेपत्ता
वनशक्ती या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की, मुंबईत पूर्वीच्या तुलनेने १ हजार हेक्टर वन गायब आहे. त्यावर अतिक्रमण झाले आहे. १ हजार हेक्टरपैकी ९०० हेक्टर वन हे केवळ आरे कॉलनीमध्ये होते.

माफियांना रोखणे गरजेचे
मुंबईत लाकूड माफिया सक्रिय आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली आहे. अतिक्रमण करणारे विकासक एक झाड तोडण्याचे ५ ते २५ हजार रुपये देतात. झाड तोडणाऱ्याला त्या झाडाचे लाकूड मोफत दिले जाते. हे लाकूड फर्निचर विक्रेते, लाकडाच्या वस्तू बनविणाºया कारागिरांना विकले जाते.

पालिका, एमएमआरडीएनेही तोडली झाडे
शहराच्या विकासासाठी, रस्ते बांधणीसाठी, पूल उभारणीसाठी मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली
आहे.

ºहासाकडे वाटचाल
वृक्षांच्या कत्तलीमुळे मुंबईचे आतोनात नुकसान होत आहे. तापमानवाढ, पाण्याची टंचाई, जैवविविधतेचे नुकसान होत आहे. मुंबई काही काळानंतर राहण्याजोगी राहणार नाही. मुंबईत विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड, हा मुंबईला ºहासाकडे नेणारा एकतर्फी रस्ता आहे.
- डी. स्टॅलिन,
प्रकल्प संचालक, वनशक्ती

वृक्षांबाबत मुंबईकरांनी आता प्रशासनावर अवलंबून न राहता, स्वत: पुढाकार घेऊन वृक्ष लागवड करायला हवी. पर्यावरणप्रेमींना जनजागृती करायला हवी.
- परवीश पंड्या, पर्यावरणतज्ज्ञ

मुंबईतल्या जंगलांना प्रशासन आणि विकासकांनी ओरबाडले आहे. संजय गांधी राष्टÑीय उद्यान, चेंबूर येथील स्मृतिवन, चिताकॅम्पमधील वृक्ष तोडली जात आहेत. सायन येथील महाराष्टÑ नेचर पार्कची जमीन झोपडपट्टी पुनर्वसन विभागाला देण्याचा घाट घातला आहे. या विरोधात मुंबईकरांनी आवाज उठवायला हवा
- राजकुमार शर्मा,
पर्यावरणतज्ज्ञ

तापमानात मोठी वाढ : मुंबईचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत अनेकदा तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दशकापूर्वीपर्यंत मुंबईत जास्तीतजास्त ३६ अंशांपर्यंत तापमान वाढत होते, असे हवामान तज्ज्ञ सांगतात. मुंबईतील वनांचा ºहास हे तापमानाच्या वाढीमागचे प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रो-३ साठी वृक्षतोड : मुंबईत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. मेट्रोसाठी सुमारे ५ हजार वृक्ष तोडण्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत सहाशे ते आठशे तोडण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्ली मेट्रोसाठी सुमारे पन्नास हजार झाडे तोडण्यात आली होती.

पाण्याचे प्रमाण कमी : मुंबईतील वृक्षतोडीमुळे मुंबईतील अनेक जुन्या विहिरी आटल्या आहेत, तर तलावांमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. झाडांची मुळे पाणी अडवतात, माती धरून ठेवतात. त्यामुळेच पाणी जमिनीत मुरते व तलाव किंवा विहिरींमध्ये साठते. वृक्षतोडीमुळे जमिनीखालच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे.

शोभेची झाडे काय कामाची? : मुंबईत प्रशासनाकडून अनेक ठिकाणी शोभेच्या वृक्षांचे रोपणे केले आहे. या वृक्षांची काळजी घेतली जाते, परंतु या वृक्षांचा जैवविविधतेला, निसर्गाला आणि मुंबईकरांना काहीच फायदा नाही. मुंबईत पूर्वी मोठ्या प्रमाणात वड, पिंपळ, आंब्याची झाडे होती, परंतु या झाडांची कत्तल झाली. आता अनेक ठिकाणी शोभेची झाडे पाहायला मिळतात.

जैवविविधतेचे नुकसान : मुंबईतील वृक्षांची कत्तल करून येथील जैवविविधतेचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे मुंबईतील पक्ष्यांचे स्थलांतरण होत आहे. प्राणी दुर्मीळ होत आहेत. जंगले नष्ट केल्यामुळे प्राण्यांना राहण्यास जागा उरली
नाही. परिणामी, बिबट्यासारखा प्राणी खाद्याच्या शोधात
मानवी वस्त्यांमध्ये येतो.

Web Title:  Mumbaikars, be careful ... forests are falling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.