मुंबई वॉर्ड-ए: इथे रोज २५ लाख लोक ये-जा करतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:58 PM2023-12-14T13:58:18+5:302023-12-14T14:25:39+5:30

वार्डाची निवासी लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास असताना रोज सुमारे तब्ब्ल २५ लाख लोक मुंबईच्या उपनगरातून, मुंबई परिसरातुन नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने 'ए' वॉर्डात येत असतात.

Mumbai Ward A 25 lakh people commute here every day | मुंबई वॉर्ड-ए: इथे रोज २५ लाख लोक ये-जा करतात!

मुंबई वॉर्ड-ए: इथे रोज २५ लाख लोक ये-जा करतात!

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले मंत्रालय, देशी-विदेशी आस्थापने, राज्य सरकार -केंद्र सरकारची कार्यालये, खाजगी कार्यालये, देशी-विदेशी बँकांची मुख्यालये, गेट वे ऑफ इंडिया सारखे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे पर्यटनस्थळ, ताजमहल- ओबेरॉय सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची पंचतारांकित हॉटेले...अशा विविधतेने 'ए' वॉर्ड नटलेला आहे. वार्डाची निवासी लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास असताना रोज सुमारे तब्ब्ल २५ लाख लोक मुंबईच्या उपनगरातून, मुंबई परिसरातुन नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने 'ए' वॉर्डात येत असतात. त्यामुळे हा वॉर्ड एकप्रकारे मुंबईचा केंद्रबिंदूच आहे.

कार्यालय पत्ता
१३४-ई , एस.बी.एस. रोड. फोर्ट. रिझर्व्ह बँकेच्या मागे. मिंट रोड.

हद्द–पूर्व सीमा 
नौदल, लष्कर केंद्र ,गेट वे ऑफ इंडिया आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट पर्यंत. पश्चिम सीमा- नरीमन पॉईंट आणि मरिन ड्राईव्ह . उत्तर सीमा- मरिन ड्राईव्ह ते ‘एफ’ रोड आणि आनंदीलाल पोद्दार मार्ग . दक्षिण सीमा- नेव्ही नगर, कफ परेड, कुलाबा आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट.

महापालिका प्रभाग - ३
नगरसेवक - ३

सुजाता सानप: वॉर्ड क्र. २२५
हर्षिता नार्वेकर : वॉर्ड क्र . २२६
मकरंद नार्वेकर : वॉर्ड क्र. २२७

वॉर्डाचे वैशिष्ट्य
मुंबईचा केंद्रबिंदू असल्याने वॉर्डाची लोकसंख्या जरी दीड लाखाच्या आसपास असली तरी नोकरी, व्यवसाय, उद्योगाच्या निमित्ताने रोज सुमारे  २५ लाख लोक या भागात येतात. 

मंत्रालय, सरकारी, खाजगी कार्यालये, बँकांची मुख्यालये, शेअर बाजार, सेबी, एल.आय.सी., मुंबई महापालिका, पोलीस मुख्यालये, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नेव्ही-आर्मी मुख्यालये, आझाद मैदान, ओव्हल मैदान, रेडीओ क्लब, बॉम्बे जिमखाना, यू.एस. क्लब, वर्ल्ड ट्रेड सेंटर... अशी महत्वाची कार्यालये- आस्थापने.

जयदीप मोरे-सहायक पालिका आयुक्त
महत्वाची आस्थापने, अति महत्वांच्या व्यक्तिंचा वावर , महत्वाची पर्यटन स्थळे , संग्रहालये, मोठ्या संख्येने  पुरातन वास्तू या वॉर्डात आहेत. त्यामुळे जबाबदारी मोठी आहे. विभागाची लोकसंख्या सुमारे दीड लाख असली तरी कामानिमित्त रोज अंदाजे २५ लाख लोक इथे येतात. त्यामुळे पायाभूत सुविधा, स्वच्छता राखणे हे मोठे आव्हान आहे. समुद्राजवळच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता ठेवण्यावर विशेष भर द्यावा लागतो. या भागात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे अनुभवात आणखी भर पडण्यासारखे आहे.

महत्त्वाची पर्यटनस्थळे
गेट वे ऑफ इंडिया, जहांगीर आर्ट गॅलरी , मरिन ड्राईव्ह , सीएसएमटी व्हीइंग गॅलरी, काळा घोडा महोत्सव.

रुग्णालये : ई .एन.टी., सेंट जॉर्ज, कामा आणि आल्ब्लेस, जी.टी. रुग्णालय, बॉम्बे हॉस्पिटल, आय.एन.एस. अश्विनी हॉस्पिटल  

वॉर्डातील मुख्य समस्या
मोठ्या प्रमाणात पुरातन वास्तू असल्याने विकासकामात अडचण. जमिनीची मालकी भिन्न-भिन्न प्राधिकरणाकडे असल्याने विकासकामे करताना सर्व यंत्रणासोबत समन्वय साधावा लागतो. 

मुंबई आणि मुंबई परिसरातून रोज २५ लाख लोक कामानिमित्त या भागात येत असल्याने पायाभूत सुविधांवर ताण पडतो. वाहनांची संख्या जास्त असल्याने रस्त्यांची कायम देखभाल करावी लागते. 

६०% लोकसंख्या झोपडपट्टीत राहणारी. समुद्रालगतच्या वस्त्या. अतिमहत्वाच्या व्यक्तिंचा, देशी-परदेशी पर्यटकांचा   राबता असल्याने  स्वच्छता, वाहतूक व्यवस्था यावर कटाक्षाने लक्ष ठेवावे लागते. पार्किंगची समस्या. 

या क्रमांकावर मिळेल सहकार्य: २२६२४०००

लोकसंख्या:  १,५०,०४२

रेल्वे स्थानक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट

लोकप्रतिनिधी
खासदार: अरविंद सावंत, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे 
आमदार: राहुल नार्वेकर भाजप

Web Title: Mumbai Ward A 25 lakh people commute here every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.