पावसातही मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:53 AM2018-06-19T06:53:54+5:302018-06-19T06:53:54+5:30

सरफेस अवेअरनेस अ‍ॅन्ड गाइडन्स (एसएजीए) या मुंबई विमानळावर लागू केलेल्या नवीन प्रणालीमुळे, विमानतळ परिसरातील विमानांची वाहतूक व हवाई क्षेत्रात असलेल्या विमानांची माहिती मिळून त्याद्वारे नियोजन करण्यात येत आहे.

In Mumbai, the traffic on the Mumbai airport is smooth | पावसातही मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीत

पावसातही मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीत

Next

- खलील गिरकर 
मुंबई : सरफेस अवेअरनेस अ‍ॅन्ड गाइडन्स (एसएजीए) या मुंबई विमानळावर लागू केलेल्या नवीन प्रणालीमुळे, विमानतळ परिसरातील विमानांची वाहतूक व हवाई क्षेत्रात असलेल्या विमानांची माहिती मिळून त्याद्वारे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे विमानांची वाहतूक सुरळीत होईल, मुसळधार पावसातही यामुळे विमान वाहतूक सुरळीत राहण्यात यश मिळेल, असा विश्वास प्रशासनाने केला. देशात केवळ मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही प्रणाली लागू असल्याचा त्यांचा दावा आहे.
विमानतळ व टर्मिनल परिसरात या प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येईल. विमान वाहतुकीला होत असलेला विलंब व त्याची कारणे याचा यामध्ये अभ्यास करण्यात येईल व त्यावर उपाययोजना करण्यात येतील. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या रडारच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचे पृथक्करण करून, जमिनीवरील वाहतूक व हवाई वाहतूक यांचे नियोजन करण्याचे महत्त्वपूर्ण काम या प्रणालीच्या माध्यमातून केले जात आहे. धावपट्टीच नव्हे, तर विमानतळाच्या आतील परिसरातील प्रत्येक विमान व इतर वाहनांच्या सद्यस्थितीवरही लक्ष ठेवण्यात येईल.
सकाळी व रात्रीच्या वेळी जेव्हा विमानांच्या वाहतुकीमध्ये वाढ झालेली असते, त्या वेळी व खराब हवामानाच्या काळात विमानाला उड्डाणासाठी विलंब होत असेल, तर त्वरित त्याची माहिती नवीन प्रणालीअंतर्गत मिळेल. त्यामुळे इतर विमानांच्या उड्डाणांची व लँडिंगची वेळ बदलणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
>ताण कमी होणार
मुंबई विमानतळ हे देशातील दुसºया क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. या विमानतळावर दोन धावपट्टी असल्या, तरी त्या एकमेकांना छेदणाºया असल्याने एका वेळी एकाच धावपट्टीचा वापर करता येतो. त्यामुळे एकूण हवाई नियोजनावर मोठा ताण येतो. या नवीन प्रणालीमुळे हा ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत व सुलभ होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

Web Title: In Mumbai, the traffic on the Mumbai airport is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.