मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुपरफास्ट; द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना वाढणार मार्गिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 07:22 AM2023-08-06T07:22:03+5:302023-08-06T07:22:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना एक-एक लेन वाढवण्यात येणार आहे. यामुळे या द्रुतगती मार्गावरची ...

Mumbai-Pune travel will be more superfast; The expressway will be extended on both sides | मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुपरफास्ट; द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना वाढणार मार्गिका

मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुपरफास्ट; द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना वाढणार मार्गिका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंना एक-एक लेन वाढवण्यात येणार आहे. यामुळे या द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार असून प्रवासाला गती मिळणार आहे. 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज सुमारे ७० हजार वाहनांची वाहतूक होते. प्रवास अधिक गतिमान व्हावा म्हणून एमएसआरडीसीने आणखी एक लेन वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला. यासाठी सुमारे ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

१० नवीन बोगदे 
द्रुतगती मार्गावर लेन वाढवताना अतिरिक्त जागेची आवश्यकता असणार आहे.  एमएसआरडीसीच्या ताब्यात काही जागा आहेत, तर आणखी काही गावांतील जागांचे संपादन करावे लागणार आहे.
शिवाय या मार्गावर १० नवीन बोगदेदेखील बांधावे लागणार आहेत. सध्याच्या बोगद्यांचा विस्तार केला जाणार नाही. मात्र, अपघातप्रवण क्षेत्राच्या जागी उड्डाणपूल बांधण्यात येणार असून ११ उड्डाणपूल 
बांधण्यात येतील.

दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना
    येत्या आठ दिवसांत दिशादर्शक फलकांची संख्यादेखील वाढविली जाणार आहे.
    या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यात ही वाहने मोठ्या प्रमाणात लेन कटिंग करत असतात. त्यामुळे या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.

Web Title: Mumbai-Pune travel will be more superfast; The expressway will be extended on both sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.