'मुंबई-पुणे एक्सप्रेस'च्या डब्याचे इंडिकेटर उलटे पूलटे : प्रवाशांची धावपळ उलटी-सुलटी

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 29, 2018 08:16 AM2018-12-29T08:16:20+5:302018-12-29T08:37:45+5:30

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर सकाळची 6 वाजून 52 मिनिटांची वेळ. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर इंटरसिटी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी वर्दळ.

'Mumbai-Pune Intercity' confusion, Indicator flip-flop | 'मुंबई-पुणे एक्सप्रेस'च्या डब्याचे इंडिकेटर उलटे पूलटे : प्रवाशांची धावपळ उलटी-सुलटी

'मुंबई-पुणे एक्सप्रेस'च्या डब्याचे इंडिकेटर उलटे पूलटे : प्रवाशांची धावपळ उलटी-सुलटी

मुंबई - सकाळी सकाळी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाने दादर स्थानकावरच प्रवाशांना मॉर्निंग वॉक करायला भाग पाडल्याचे चित्र सकाळी 6.52 वाजता दिसले. मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा, यावेळी गाडीचे इंडिकेटर उलटे-सुलटे लागल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांची एकच धावपळ उडाली. शेवटी, समोर दिसेल तो डब्बा पकडून प्रवाशी रेल्वेत चढल्याचे दिसून आले.  

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर सकाळची 6 वाजून 52 मिनिटांची वेळ. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर इंटरसिटी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी वर्दळ. दैनिक नियोजनानुसार नेहमीच्या वेळेत गाडी क्र. 12127  मुंबई - पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली. प्रवाशीही प्लॅटफॉर्म वरील डब्याचे इंडिकेटर दर्शवत असल्याप्रमाणे गाडीची वाट पहात उभे होते. तितक्यात गाडी येऊन प्लॅटफॉर्मवर उभी राहिली असून प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. कारण, गाडीतील कोच क्रमांक D1 ते D9 या द्वितीय श्रेणीतील डब्यांची स्थिती ज्यानुसार प्लॅटफॉर्मवर दाखविली होती, ती नेमकी उलट होती. म्हणजे जिथे D9 डबा दाखविला तिथे D1 डबा आला होता. रेल्वे कोचच्या या उलट-सुलट परिस्थितीमुळे प्रवाशांची स्थिती बिकट बनली होती. विशेष म्हणजे ही गाडी जेमतेम एक मिनिटभरच थांबून लगेच सुटते. त्यामुळे प्रवाशांनी आपत्कालीन स्थितीचा अंदाज घेत, मिळेल तो डबा आपलाच समजून डब्यात शिरकाव करत सुटकेचा निश्वास टाकला. 

ऐन सकाळच्या प्रवासात प्रवाशांना अशा आपत्कालीन स्थितीचा सामना करावा लागल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, आलेया भोगासी असावे, साधन या उक्तीप्रमाणे वेळ भागवून नेत प्रवाशांनी आपल्या जागेची शोधमोहिम सुरू केली. या गाडीतून वृद्ध पुरुष-महिला, तरुण, ऑफिस कामासाठी जाणारे चाकरमानी, आपल्या तान्हुल्या मुलांना घेऊन जाणाऱ्या माता-भगिणी प्रवास करत होत्या. रेल्वे प्रशासनाच्या या चुकीमुळे या सर्वच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर, गाडीत बसल्यानंतर कसरत करत या प्रवाशांना आपली जागी पकडली. या सकाळच्या धावपळीच्या खेळानंतर गाडी पुण्याकडे मार्गक्रमण झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.  

दरम्यान, गाडीचे इंडिकेटर चुकीचे दर्शविल्याने गाडीच चढल्यानंतर आपापला डबा शोधतानाही प्रवाशांची दमछाक झाली. डबा शोधण्यासाठी प्रवाशी मागे जाण्याऐवजी पुढे जाऊ लागले. डब्यात उलटे सुलटे प्रवाशी आपापला डबा शोधत असल्याने धड कोणाला पुढे आणि मागे जाता येत नव्हते. त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध यांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. तर, आपल्या हातातील सामान, बॅग्ज घेऊन आपली जागा शोधताना मोठी कसरत या प्रवासांना करावी लागली. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये उडालेला हा गोंधळ ठाणे स्थानक येईपर्यंत सुरूच होता. 

व्हिडीओ

Web Title: 'Mumbai-Pune Intercity' confusion, Indicator flip-flop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.