आता मुंबई-पुणे बुलेट ट्रेन; देशातील ७ शहरांमध्ये ४ हजार १०० किमीचे जाळे उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:09 AM2018-02-14T06:09:13+5:302018-02-14T06:09:40+5:30

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या घोषणेनंतर देशात बुलेट ट्रेनच्या हालचालींना वेग आला आहे. ७ शहरांमध्येदेखील बुलेट कॉरिडोर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबई-पुणे बुलेट ट्रेनचाही समावेश आहे.

Mumbai-Pune bullet train now; 4 thousand 100 km of network will be set up in seven cities of the country | आता मुंबई-पुणे बुलेट ट्रेन; देशातील ७ शहरांमध्ये ४ हजार १०० किमीचे जाळे उभारणार

आता मुंबई-पुणे बुलेट ट्रेन; देशातील ७ शहरांमध्ये ४ हजार १०० किमीचे जाळे उभारणार

Next

- महेश चेमटे

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या घोषणेनंतर देशात बुलेट ट्रेनच्या हालचालींना वेग आला आहे. ७ शहरांमध्येदेखील बुलेट कॉरिडोर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबई-पुणे बुलेट ट्रेनचाही समावेश आहे. वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या बुलेट ट्रेनचे, देशभरात ४ हजार १०० किमी लांबीचे जाळे उभारण्याचा निर्णय नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने घेतल्याची माहिती कॉर्पोरेशनच्या (एनएचसीएल) सूत्रांनी दिली.
रस्ते मार्गाने २ ते ३ तासांचा कालावधी लागणाºया शहरांचा विचार बुलेट ट्रेनसाठी करण्यात आला आहे. त्यासाठी देशभरात ७ छोटे कॉरिडोर उभारण्यात येणार आहेत. यात मुंबई-पुणे बुलेट कॉरिडोरचा समावेश आहे. बुलेट ट्रेनचे तिकीट दर विमानापेक्षा कमी असतील. रोडने मुंबई-पुणे मार्गासाठी ३ ते ४ तास लागतात. बुलेट ट्रेनने हे अंतर ७५ मिनिटांच्या आत पूर्ण करता येईल, असा दावा एनएचसीएलच्या सूत्रांनी केला आहे. देशभरात ४ हजार १०० किमी लांबीचे बुलेट ट्रेनचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. यात छोटे कॉरिडोर ५ वर्षांत उभे करण्याचे लक्ष्य आहे. याची अंदाजे किंमत निश्चित केलेली नाही. दिल्ली-पटणा, हावडा-कोलकाता, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरू-तिरुवनंतपुरम व दिल्ली-जयपूर-जोधपूर या बुलेट ट्रेन प्रकल्पांचा यात समावेश आहे.

स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पासाठी एनएचसीएलच्या शिष्टमंडळाने १२ फेबु्रवारी रोजी डहाणू-पालघर परिसराला भेट दिली. या वेळी बुलेट ट्रेनबाबत गैरसमज पसरविले जात असल्याचे वास्तव, एनएचसीएलच्या शिष्टमंडळासमोर उघडकीस आले. या परिसरात अनेक प्रकल्प सुरू असल्याने, स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रत्येक प्रकल्पाच्या नियमांनुसार जमिनीचा वेगवेगळा मोबदला देण्यात येतो. यामुळे स्थानिकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण होते.

Web Title: Mumbai-Pune bullet train now; 4 thousand 100 km of network will be set up in seven cities of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.