मुंबई प्रदूषण: रात्री ८ ते १०... फटाके वाजवण्यासाची फक्त दोनच तासांची मुभा
By दीप्ती देशमुख | Published: November 10, 2023 08:18 PM2023-11-10T20:18:18+5:302023-11-10T20:18:42+5:30
शुक्रवारी तीन तासांची मुभा कमी करत दोन तासांवर आणण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता पाहता उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या आदेशात सुधारणा करत अवघे दोनच तास फटाके वाजवण्याची मुभा दिली आहे. रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके वाजवण्याची परवानगी दिली आहे.
मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ६ नोव्हेंबर रोजी मुंबई महानगर प्राधिकरणातील महापालिकांच्या हद्दीत रात्री ७ ते १० या वेळेत फटाके फोडण्यास मुभा दिली होती. मात्र, शुक्रवारी या निर्देशात सुधारणा करत न्यायालयाने फटाके वाजवण्यास दिलेली तीन तासांची मुभा कमी करत दोन तासांवर आणली. आता रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवले जाऊ शकतात.
दरम्यान,न्यायालयाने बांधकाम ठिकाणी आणि त्याच्या बाहेर मलबा नेण्यास १९ नोव्हेंबरपर्यंत बंदी कायम केली