मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या, एसआरएचा वाद कारणीभूत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 02:38 AM2018-04-23T02:38:50+5:302018-04-23T02:38:50+5:30

सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील अप्पापाडा येथील शाखा क्रमांक ३९ चे माजी उपशाखाप्रमुख होते.

In Mumbai, the murder of a former sub-judge of Shivsena, causes SRA to arise? | मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या, एसआरएचा वाद कारणीभूत?

मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या, एसआरएचा वाद कारणीभूत?

googlenewsNext

मुंबई : मालाडमधील शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची रविवारी रात्री भररस्त्यात गोळीबार करून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून ही हत्या केली. कुरार पोलीस तपास करत असून एसआरएच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.
सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील अप्पापाडा येथील शाखा क्रमांक ३९ चे माजी उपशाखाप्रमुख होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते मित्रासोबत जात असताना हा गोळीबार झाला.

यापूर्वीही झाला होता हल्ला
गोळीबारानंतर जखमी सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सावंत यांच्यावर २००९ मध्ये देखील अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यात ते बचावले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना पदाधिकाºयांच्या हत्येची तिसरी घटना
काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन नेत्यांची हत्या झाली, तर शनिवारी भिवंडीत शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची जंगलात हत्या करून त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता.

Web Title: In Mumbai, the murder of a former sub-judge of Shivsena, causes SRA to arise?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.