तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 03:33 PM2018-12-01T15:33:06+5:302018-12-01T15:33:27+5:30

मुंबई मेट्रो रेल्वेची घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Mumbai Metro service disrupted because of technical difficulties | तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत 

तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत 

मुंबई - मुंबईमेट्रो रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज दुपारी घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मेट्रो रेल्वे जागृतीनगर स्थानकात थांबवण्यात आली. त्यामुळे घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी मेट्रोची वाहतूक ठप्प झाली आहे. 
आज दुपारी घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी मेट्रो जागृतीनगर स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आली. त्यामुळे वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रोच्या वाहतुकीचा खोळंबा सुरू झाला. दरम्यान, मेट्रोची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: Mumbai Metro service disrupted because of technical difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.