मुंबई मेट्रो वनची पाच वर्षे पूर्ण, पाच वर्षांत ५४ कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 03:35 AM2019-06-09T03:35:14+5:302019-06-09T03:35:39+5:30

एमआरटीएस क्षेत्राचे व्यवस्थापन बहुतांशी सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांकडून केले जाते.

 Mumbai Metro One completed five years, serving 54 crores passengers in five years | मुंबई मेट्रो वनची पाच वर्षे पूर्ण, पाच वर्षांत ५४ कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा

मुंबई मेट्रो वनची पाच वर्षे पूर्ण, पाच वर्षांत ५४ कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा

Next

मुंबई : मुंबईमेट्रो वनने मुंबईकर प्रवाशांसाठी सेवा पुरवण्याची पाच वर्षे पूर्ण केली आहेत. मुंबई मेट्रो वन हा भारतातील सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीचा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. मुंबई मेट्रो वनने गेल्या पाच वर्षांत ५४ कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा पुरवली आहे. ही संख्या मुंबईच्या लोकसंख्येच्या तब्बल ४० पट असल्याचे मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

एमआरटीएस क्षेत्राचे व्यवस्थापन बहुतांशी सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांकडून केले जाते. मात्र, मुंबई मेट्रो वन हे या बाबतीत आदर्श उदाहरण ठरले आहे. नियोजनातील कार्यक्षमता, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि ग्राहककेंद्री कार्यपद्धतीमुळे मुंबई मेट्रो वनने उत्तम पद्धतीने आपला ठसा उमटवला असल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले. ६.१७ लाख फेऱ्यांमध्ये ट्रेनची उपलब्धता आणि वक्तशीरता ९९.९ टक्के आहे. मुंबई मेट्रो वन कोणत्याही दुर्घटनेविना वसोर्वा-अंधेरी-घाटकोपर या परिसराची जीवनवाहिनी झाली आहे. मुंबईची पहिली मेट्रो असूनही संचलकांना प्रवाशांमध्ये मेट्रो संस्कृती रूजवण्यात आणि मेट्रोची कार्यपद्धती समजावून देण्यात यश आले आहे. त्यामुळेच मुंबईकर प्रवाशांनी त्यांचे मुंबई मेट्रो वनवर असलले प्रेम, पाठिंबा, आपुलकी विविध माध्यमातून मोकळेपणाने व्यक्त केले असल्याचेही प्रवक्त्याने स्पष्ट केले.

तसेच मुंबई मेट्रो वनच्या पाच वर्षपूतीर्चा टप्पा साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या पाच वर्षांत आम्ही वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या कॉरिडॉरमधील मुंबईकरांना आनंददायी अनुभव देण्याचा प्रयत्न केला. मुंबई मेट्रो वनविषयी मुंबईकरांच्या आपुलकी आणि प्रेमामुळे या परिसराची जीवनवाहिनी होण्यात आम्ही यशस्वी ठरलो. गजबलेल्या मुंबईत नागरिकांनी मेट्रो संस्कृती सहजगत्या आत्मसात केली आहे. आतापर्यंत नागरिकांकडून मिळालेले सहकार्य या पुढील काळातही मिळेल याची खात्री आहे. याच उत्साहाने आणि समर्पित वृत्तीने आम्ही मुंबईकरांना पुढील २४ वर्षं सेवा देत राहू, असेही मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्याने नमूद
केले.
 

Web Title:  Mumbai Metro One completed five years, serving 54 crores passengers in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.