मुंबई मेट्रो ३ तर्फे सिद्धिविनायक  ते कफ परेड स्थानकांच्या लिफ्ट कार्यप्रणालीचा करार संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 04:27 PM2018-10-29T16:27:29+5:302018-10-29T16:28:03+5:30

मुंबई मेट्रो ३ मार्गिकेच्या १४ मेट्रो स्थानकांच्या (सिद्धिविनायक ते कफ परेड मेट्रो स्थानक) जायका कंपनीकडून कायदेशीर पडताळणीनंतर लिफ्ट (एस्केलेटर) कार्यप्रणालीचा महत्वपूर्ण करार संपन्न झाला आहे. 

Mumbai Metro 3 News | मुंबई मेट्रो ३ तर्फे सिद्धिविनायक  ते कफ परेड स्थानकांच्या लिफ्ट कार्यप्रणालीचा करार संपन्न

मुंबई मेट्रो ३ तर्फे सिद्धिविनायक  ते कफ परेड स्थानकांच्या लिफ्ट कार्यप्रणालीचा करार संपन्न

Next

मुंबई - मुंबईमेट्रो ३ मार्गिकेच्या १४ मेट्रो स्थानकांच्या (सिद्धिविनायक ते कफ परेड मेट्रो स्थानक) जायका कंपनीकडून कायदेशीर पडताळणीनंतर लिफ्ट (एस्केलेटर) कार्यप्रणालीचा महत्वपूर्ण करार संपन्न झाला आहे. 

'युआंडा - रॉयल कन्सोर्टियम' चायना कन्सोर्टियम' यांच्यासह हा करार झाला असून पॅकेजेस १६ बी (लॉट -एल२) च्या लिफ्टबांधणी करणार आहेत. ही कंपनी संबंधित बोलीदारांमधील सर्वात स्पर्धात्मक असल्याने देण्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा करार संबंधित कंपनीसोबत केला आहे. या कामामध्ये एकूण १४ स्थानकांच्या लिफ्टचे डिझाइन, निर्मिती, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसह इतर संबंधित  ८६ प्रकारची कामे ही कंपनी करणार आहे. जास्त प्रवाशांच्या ये- जा करता संक्षिप्त रूपातल्या या लिफ्टवर(एस्केलेटर) विशेष पद्धतीने लक्ष दिले जात आहे, त्याचप्रमाणे ऊर्जाबचत व्हावी त्यासाठी रियल टाइम मॉनिटरेटिंग आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लिफ्टचे काम चालणार आहे.

त्यावर आपले मत व्यक्त करताना एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या , "मेट्रो ३ च्या भुयारी प्रवासात लिफ्ट्स (एस्केलेटर) अंमलबजावणी  हा प्रवाशांच्या आरामदायक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. मेट्रो३ साठी मजबूत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत लिफ्ट्स प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा आमचा उद्देश आहे आणि वेळेत कार्य पूर्ण करावे जेणेकरून लाइन ३ हा प्रकल्प निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केला जाऊ शकेल."

Web Title: Mumbai Metro 3 News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.