मुंबई महापौर श्रीचा थरार २२ एप्रिलला

By admin | Published: April 21, 2017 12:56 AM2017-04-21T00:56:05+5:302017-04-21T00:56:05+5:30

प्रतिष्ठेच्या ‘मुंबई महापौर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार २२ एप्रिलला रंगणार आहे. ना.म. जोशी मार्गावरील आरोग्यधाम व्यायाम मंदिरात रंगणाऱ्या या स्पर्धेत सुमारे ९० खेळाडू विजेतेपदासाठी

Mumbai mayor Shri Tharar on April 22 | मुंबई महापौर श्रीचा थरार २२ एप्रिलला

मुंबई महापौर श्रीचा थरार २२ एप्रिलला

Next

मुंबई : प्रतिष्ठेच्या ‘मुंबई महापौर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार २२ एप्रिलला रंगणार आहे. ना.म. जोशी मार्गावरील आरोग्यधाम व्यायाम मंदिरात रंगणाऱ्या या स्पर्धेत सुमारे ९० खेळाडू विजेतेपदासाठी पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करतील.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेली ही स्पर्धा मुंबई महापालिका निधीतून खेळवण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांत दोन वेळा विजेतेपद मिळवणारा सुनीत जाधव पुन्हा एकदा विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी महाराष्ट्र श्री ठरलेला असल्याने सुनीतलाच संभाव्य विजेता मानले जात आहे.
त्याच वेळी सुनीतला
रोखण्यासाठी यंदाचा मुंबई श्री विजेता अतुल आंब्रे, नितीन म्हात्रे आणि विलास घडवले सज्ज आहेत.
दरम्यान, किताब विजेत्यासह स्पर्धेतील सात गटांतील विजेत्यांना रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाय बेस्ट पोझरसाठीही रोख पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mumbai mayor Shri Tharar on April 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.