मुंबई: भोंदूबाबाला अटक, महिलेसह तिच्या मुलीवर बलात्कार; पवईतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:15 AM2017-11-15T03:15:36+5:302017-11-15T03:15:55+5:30

धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली महिलेसह तिच्या सोळा वर्षांच्या मतीमंद मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रकार पवईमध्ये उघडकीस आला आहे.

Mumbai: Bhondu baba arrested, raped woman along with woman; Powai type | मुंबई: भोंदूबाबाला अटक, महिलेसह तिच्या मुलीवर बलात्कार; पवईतील प्रकार

मुंबई: भोंदूबाबाला अटक, महिलेसह तिच्या मुलीवर बलात्कार; पवईतील प्रकार

Next

मुंबई: धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली महिलेसह तिच्या सोळा वर्षांच्या मतीमंद मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रकार पवईमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी नागेश भंडारीला गुन्हे शाखेच्या कक्ष दहाने अटक केली.
पीडित महिला सुमन (नावात बदल) ही पवईत दोन मुलींसह राहते. २०१२ मध्ये ती नव-यापासून विभक्त झाली. सोळा वर्षांची मुलगी लता (नावात बदल) ही मतीमंद असल्याने सुमन नेहमी तणावात असायची. याच दरम्यान शेजारच्या घरात भोंदू भंडारी राहायला आला. त्याने आपल्याजवळ दैवीशक्ती असल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीची समस्या घेऊन सुमन भंडारीकडे जायची. त्यांच्यात जवळीक वाढली. त्याने सुमनसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच भंडारीने लताचाही गैरफायदा घेण्यास सुरूवात केली.
देवीची पूजा करण्याचा बनाव करत त्याने डोळे बंद करायला सांगून जबरदस्ती केल्याचे मुलीने आईला सांगितले. याबाबत सांगितले तर घरातील सर्वजण मरुन जातील, असेही त्याने घाबवरले. त्यानंतर मंगळुरूला पळुन गेलेला भोंदूबाबा तिथून धमकावत होता. या प्रकारानंतर महिलेने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदिराज, पठाण, डोपेवाड, दोरकर, शोभा खरात आणि पोलिसांनी मिळून भंडारीच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Mumbai: Bhondu baba arrested, raped woman along with woman; Powai type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.