वेतनासाठी एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे; राज्यमंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:57 AM2019-07-20T00:57:24+5:302019-07-20T00:57:28+5:30

१९ जुलै उलटला, तरी देण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने, संतप्त झालेल्या एमटीएनएल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रभादेवी येथील टेलिकॉम हाउससमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले.

MTNL employees' wages for salary; Meet the Minister of State | वेतनासाठी एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे; राज्यमंत्र्यांना भेटणार

वेतनासाठी एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे; राज्यमंत्र्यांना भेटणार

Next

मुंबई : जून महिन्याचे प्रलंबित वेतन १९ जुलै उलटला, तरी देण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने, संतप्त झालेल्या एमटीएनएल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रभादेवी येथील टेलिकॉम हाउससमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. जूनचे वेतन त्वरित मिळावे, वेतनाबाबत सातत्याने होत असलेला गोंधळ टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शनिवारीदेखील हे आंदोलन करण्यात येणार आहे, तसेच या संदर्भात मुंबई दौºयावर आलेल्या केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांची भेट घेण्यात येणार आहे.
महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड आॅफिसर्स असोसिएशन, महाराष्टÑ टेलिफोन निगम लिमिटेड एक्झिक्युटिव्ह असोसिएशन यांच्यातर्फे संयुक्तपणे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव, असोसिएशनचे सूर्यकांत मुद्रास यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी शुक्रवारच्या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे शनिवारी बैठकीनिमित्त प्रभादेवी येथील टेलिकॉम हाउसमध्ये येणार आहेत, त्यावेळी त्यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्यात येईल व गांभीर्याने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती जाधव यांनी दिली. पूर्वी महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणारे वेतन गेल्या काही महिन्यांपासून अनियमितपणे होत आहे. जून महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही व त्याबाबत कोणतेही परिपत्रकदेखील काढण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचारी व अधिकाºयांमध्ये नाराजी आहे.
मासिक वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने कर्मचारी आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना आखावी, अशी मागणी कर्मचाºयांमधून केली जात आहे. प्रभादेवी येथील धरणे आंदोलनामध्ये कर्मचाºयांनी वेतनासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: MTNL employees' wages for salary; Meet the Minister of State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.