कोमसाप संमेलनाध्यक्षपदी जयंत पवार

By admin | Published: August 19, 2015 01:22 AM2015-08-19T01:22:14+5:302015-08-19T01:22:14+5:30

कोकण मराठी साहित्य परिषदेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून, यंदा मुंबईत राजा शिवाजी विद्यालय येथे २७, २८ व २९ नोव्हेंबर रोजी कोमसापचे

Mr. Jayant Pawar is the President of the Conference | कोमसाप संमेलनाध्यक्षपदी जयंत पवार

कोमसाप संमेलनाध्यक्षपदी जयंत पवार

Next

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून, यंदा मुंबईत राजा शिवाजी विद्यालय येथे २७, २८ व २९ नोव्हेंबर रोजी कोमसापचे साहित्यसंमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद नाटककार जयंत पवार भूषविणार आहेत.
या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात व्यासपीठ व्यवस्था - रवींद्र आवटी, विद्या प्रभू, ग्रंथ दिंडी समिती - सुनील सोनावणे, निरंजन जोशी, ग्रंथदालन समिती - पंढरीनाथ रेडकर, अशोक शिंदे, प्रसाद कुलकर्णी, प्रसिद्धी विभाग - अशोक शिंदे, निरंजन जोशी, सोशल मीडिया - नितीन पाटील, वैभव साटम, निवास समिती - दत्तात्रय सैतवडेकर, पंढरीनाथ रेडकर, स्वागत कक्ष समिती - लता गुठे, ज्योती शिंदे (रोहे), संजय जाधव, भोजन समिती - निमा चिटणीस, यशवंत कदम, कार्यालयप्रमुख - गजानन परब, पंढरीनाथ रेडकर, आरोग्य व प्रथमोपचार - विठ्ठल प्रभू, सूर्यकांत मालुसरे, परिवहन समिती - प्रकाश मेंगाणे, रमेश आव्हाड, रविकिरण पराडकर, निधी संकलन - सुनंदा, नितीन बापट, यशवंत कदम आदी समाविष्ट आहेत.

Web Title: Mr. Jayant Pawar is the President of the Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.