मुंबईत जून महिन्यात समाधानकारक पाऊस; उद्या जोरदार, हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:16 AM2018-07-03T04:16:19+5:302018-07-03T04:16:26+5:30

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच्या सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली असतानाच, जून महिन्याच्या नोंदीनुसार मुंबईत ७९५.५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

Monsoon rains in June; Tomorrow, Forecasting of Meteorological Department | मुंबईत जून महिन्यात समाधानकारक पाऊस; उद्या जोरदार, हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

मुंबईत जून महिन्यात समाधानकारक पाऊस; उद्या जोरदार, हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Next

मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच्या सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली असतानाच, जून महिन्याच्या नोंदीनुसार मुंबईत ७९५.५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत या वर्षी जूनमध्ये पडलेला पाऊस समाधानकारक आहे. दरम्यान, बुधवार ४ जुलै रोजी मुसळणार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
जून महिन्यातील दोन आठवड्यांतील शनिवारसह रविवारी पावसाने धुमाकूळ घातला होता. एका आठवड्यातील सोमवारी पडलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला होता. दोन आठवड्यांतील शनिवार, रविवार आणि तुफान पावसाचा सोमवार वगळता, उर्वरित दिवस मुंबईत पावसाने मान्सूनच्या तुलनेत विशेष जोर धरला नाही. उलटपक्षी पावसाने उघडीप घेतल्याने, मुंबईकर उन्हासह उकाड्याने बेजार झाले होते. महत्त्वाचे म्हणजे, अतिमुसळधार पावसाच्या नोंदीनंतर मुंबईसाठी तीन दिवसांकरिता देण्यात आलेला अतिमुसळधार पावसाचा इशाराही भारतीय हवामान शास्त्र विभागाने मागे घेतला होता. परिणामी, अनेक दिवसांआड पडलेल्या पावसानुसार जून महिन्यात मुंबईत ७९५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

- ३ जुलै रोजी कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ आणि ५ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ६ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३ जुलै रोजी शहर आणि उपनगरात पावसाच्या तुरळक सरी पडतील, तर
४ जुलै रोजी शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


पावसाची नोंद (मिमी)
१ जुलै २०१८ पर्यंत एकूण पाऊस
कुलाबा ७९५.५
सांताक्रुझ ७९४.६
वार्षिक सरासरी
कुलाबा २२३४
सांताक्रुझ २५१५
२०१८ पावसाची टक्केवारी
कुलाबा ३५.६१
सांताक्रुझ ३१.५९
१ जुलै २०१७ पर्यंत एकूण पाऊस
कुलाबा ५७५.६
सांताक्रुझ ६८३.८
२०१७ टक्केवारी
२६.१५
२७.१३

Web Title: Monsoon rains in June; Tomorrow, Forecasting of Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस