येत्या ४८ तासात मान्सून अंदमानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:25 AM2018-05-25T01:25:05+5:302018-05-25T01:25:05+5:30

‘मेकुनू’चा अडथळा दूर; विदर्भात उष्णतेची लाट

Monsoon Andaman in the next 48 hours | येत्या ४८ तासात मान्सून अंदमानात

येत्या ४८ तासात मान्सून अंदमानात

googlenewsNext

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘मेकुनू’चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा आल्याने त्याचे दक्षिण अंदमान समुद्रातील आगमन लांबले आहे़ परंतु, आता हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने दूर गेले असून मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़ येत्या ४८ तासात मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ २७ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २८ मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ २५ ते २८ मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
राजस्थानाचा काही भाग, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरातील काही भाग तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भातील एक ते दोन ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़

राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ३५़७, लोहगाव ३६़९,अहमदनगर ३६़५, महाबळेश्वर २४़६, मालेगाव ४१़२, नाशिक ३६़३, सांगली ३५़३, सातारा ३२़६, सोलापूर ३९़३, मुंबई ३४़६, सातांक्रुझ ३४़७, रत्नागिरी ३४़३, पणजी ३४़६, उस्मानाबाद ४१़३, औरंगाबाद ४१, नांदेड ४३, बीड ४१़२, अकोला ४४़७, अमरावती ४४़८, बुलढाणा ३९़५, ब्रम्हपूरी ४१़८, चंद्रपूर ४५़७, नागपूर ४४़७, वर्धा ४६, यवतमाळ ४४़५़

Web Title: Monsoon Andaman in the next 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.