मनसे-काँग्रेसमध्ये कांदिवलीत राडा, निरुपम यांच्यावरही गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:57 AM2017-10-26T04:57:44+5:302017-10-26T04:59:25+5:30

मुंबई : मनसेला टार्गेट करत फेरीवाल्यांच्या बाजूने भाषण करण्यास आलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला.

MNS and Congress also accused Kadivlit Rada, Nirupam | मनसे-काँग्रेसमध्ये कांदिवलीत राडा, निरुपम यांच्यावरही गुन्हा

मनसे-काँग्रेसमध्ये कांदिवलीत राडा, निरुपम यांच्यावरही गुन्हा

Next

मुंबई : मनसेला टार्गेट करत फेरीवाल्यांच्या बाजूने भाषण करण्यास आलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे विरोध दर्शविला. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करत मनसेच्या सात जणांना बुधवारी अटक केली आहे. तर निरुपमसह त्यांच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला.
कांदिवली पूर्वच्या आकुर्ली परिसरातील फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी बुधवारी दुपारी २च्या सुमारास आलेल्या निरुपम यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी झडप मारली. मनसेचे गुंड फेरीवाल्यांवर दादागिरी करत असून, त्याविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे निरुपम म्हणाले होते. पण मनसेच्या कार्यकर्त्यांना ‘गुंड’ ही उपमा देत त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची धमकी रविवारी निरुपम यांनी दिली होती. त्यांनी त्याचसाठी कांदिवलीत येऊन फेरीवाल्यांसाठी आंदोलन केले. या वेळी त्यांच्यासोबत उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक सूत्राळे, आझाद हॉकर्स युनियनची महासचिव सलमा आणि काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते हजर होते. निरुपम यांनी कांदिवलीत केलेल्या भाषणामध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अपशब्द वापरले. तसेच मनसेच्या गुंडांना धडा शिकविणार असेही म्हटले. त्याबाबत समजताच मनसेच्या सात कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या गाडीच्या ताफ्यात शिरून त्यांची गाडी अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु समतानगर पोलिसांनी त्यांची वेळीच धरपकड केली.
>मनसेच्या सात कार्यकर्त्यांना अटक
मनसेचे विभाग अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे, धीरज चौधरी, शरद वाघ, भास्कर परब, संतोष भोर, लक्ष्मण त्रीमल, संदेश भसाळे या सात कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले. त्यांच्यावर जमावबंदी उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले. तर निरुपम यांच्यासह त्यांच्या नऊ कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे माने म्हणाले.

Web Title: MNS and Congress also accused Kadivlit Rada, Nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.