कोट्यवधींची फसवणूक; चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:13 AM2017-12-30T06:13:32+5:302017-12-30T06:13:46+5:30

मालेगाव (जि.नाशिक) येथे सार्वजनिक बांधकाम विभाग; वेब मॅनेजमेंट कंपनी स्थापन करुन बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश यतिन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

Millennium fraud; Committee for inquiry | कोट्यवधींची फसवणूक; चौकशीसाठी समिती

कोट्यवधींची फसवणूक; चौकशीसाठी समिती

Next

मुंबई : मालेगाव (जि.नाशिक) येथे सार्वजनिक बांधकाम विभाग; वेब मॅनेजमेंट कंपनी स्थापन करुन बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश यतिन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
विधान परिषदेचे सदस्य डॉ.अपूर्व हिरे यांनी विधिमंडळ अधिवेशनात या बाबत प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते.
या प्रकरणात १२० बेरोजगारांना बनावट नियुक्ती पत्रे देण्यात आली आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच वेबसाइटवरुन संबंधित तरुणांना नोकरीचे आदेश देण्यात आल्याचे भासविण्यात आले होते. या फसवणूक प्रकरणात बांधकाम विभागाचे काही अधिकारी सामील असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.त्याचीही चौकशी शिंदे समिती करणार आहे. समिती एक महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करेल.

Web Title: Millennium fraud; Committee for inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.