म्हाडाच्या लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद, ८१९ सदनिकांची सोडत १० नोव्हेंबरला सकाळी १० वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:50 AM2017-10-25T01:50:23+5:302017-10-25T01:50:30+5:30

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांची सोडत १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.

Mhada Lottery will receive a very low response, 819 tanks will be opened at 10 am on 10th November at Rangsharada Hall in Bandra. | म्हाडाच्या लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद, ८१९ सदनिकांची सोडत १० नोव्हेंबरला सकाळी १० वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार

म्हाडाच्या लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद, ८१९ सदनिकांची सोडत १० नोव्हेंबरला सकाळी १० वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार

Next

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांची सोडत १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. मात्र या वर्षी घरांच्या वाढलेल्या किमतींसह कमी घरांच्या संख्येमुळे सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.
म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करण्याचा २३ आॅक्टोबर हा अखेरचा दिवस होता. परिणामी, अखेरच्या मुदतीपर्यंत ६६ हजार ७८० जणांनी म्हाडाच्या घरासाठी संकेतस्थळावर नोंद केली. तर अर्ज सादर करण्यासाठी २४ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत अखेरचा दिवस होता. २४ आॅक्टोबरच्या सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, म्हाडाच्या घरांसाठी प्राधिकरणाकडे ७७ हजार ४१ अर्ज दाखल झाले; आणि ४८ हजार ३० अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला. दरम्यान, एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरणा करण्यासाठी चलन निर्मिती २५ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार आहे. आॅनलाइन पेमेंट स्वीकृती २६ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार आहे. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरणा २६ आॅक्टोबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे २६ आॅक्टोबर रोजी यासंबंधीची अंतिम आकडेवारी समोर येईल.

Web Title: Mhada Lottery will receive a very low response, 819 tanks will be opened at 10 am on 10th November at Rangsharada Hall in Bandra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा