Metro 3 : पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचे भुयारीकरण 378 दिवसांत पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:56 PM2019-02-13T17:56:08+5:302019-02-13T17:59:38+5:30

अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या १.१३ किमीचे भुयारीकरण अवघ्या ३१८ दिवसात पूर्ण करण्यात आले. कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ च्या पॅकेज ७ मधील तिसऱ्या भुयारीकरण टप्प्याचे बुधवारी(13 फेब्रुवारी) अनावरण झाले.

Metro 3: Pali Ground to International Airport tunneling completion in 378 days | Metro 3 : पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचे भुयारीकरण 378 दिवसांत पूर्ण 

Metro 3 : पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचे भुयारीकरण 378 दिवसांत पूर्ण 

googlenewsNext

मुंबई - अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या १.१३ किमीचे भुयारीकरण अवघ्या ३१८ दिवसात पूर्ण करण्यात आले. कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ च्या पॅकेज ७ मधील तिसऱ्या भुयारीकरण टप्प्याचे बुधवारी(13 फेब्रुवारी) अनावरण झाले. हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टर्मिनल २ या ठिकाणी पार  पडला. १५० निष्णात अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगार यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे पॅकेज ७ मधील डाऊन मार्गावर ९३७ आरसीसी सिमेंट रिंग्सचा वापर करत तब्ब्ल १.३१ किमी पल्ला गाठण्यात आला. 

मरोळ नाका ते आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानचा बेसाल्ट, ब्रेशिया अशा प्रकारच्या कठीण खडकांना भेदण्याचे काम 'वैनगंगा-३' या टनेल बोअरिंग मशीनने दिनांक २ एप्रिल २०१८ पासून काम सुरू केले. हे शांघाय टनेलिंग इंजिनियरिंग कंपनीने तयार केलेले मशीन ९२ मीटर लांबीचे असून प्रतिदिन ४.१२ मीटर इतक्या वेगाने भुयारीकरण करते. या मशीनने सध्या कार्यरत असलेली मेट्रो लाईन १ आणि सहार उन्नत मार्ग यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून भुयारीकरण करून आपले ध्येय अत्यंत सुरक्षितपणे साध्य केले आहे.

मुंबई मेट्रो ३ चे पॅकेज ७ मरोळ नाका येथे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ आणि जेव्हीएलआर येथे प्रस्तावित स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी मेट्रो ६ यांना जोडणार आहे. तसेच मुंबई  उपनगरीय रेल्वे सेवेने न जोडली  गेलेली एमआयडीसी, सीप्झ यासारखी महत्त्वाची औद्योगिक आणि रोजगार केंद्रेही जोडणार आहे. मुंबई मेट्रो ३ अंतर्गत एकूण १७ टीबीएम मशीन दहा लाँचिंग शाफ्ट मधून कार्यरत करण्यात आले आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, " मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देऊन यशाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. भविष्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबई मेट्रो- ३ मार्गिका मेट्रो-१ आणि प्रस्तावित मेट्रो-६ मार्गिकेला जोडली जाणार आहे." मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पूर्ण प्रकल्पातील५२ किमी भुयारीकरणापैकी २० किमी इतके भुयारीकरण पूर्ण झाले असून पॅकेज-७ मधील ५०% इतके भुयारीकरण (३.५७ किमी) पूर्ण झाले आहे. पॅकेज ७ चे हे काम एल अँड टी आणि शांघाय टनेल इंजिनियरिंग  कंपनी- समूह करत आहेत.

Web Title: Metro 3: Pali Ground to International Airport tunneling completion in 378 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो