आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:35 AM2018-01-14T03:35:19+5:302018-01-14T03:35:34+5:30

अभियांत्रिकी कामांकरिता रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १४ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

Megablocks on the Harbor, Harbor Road today; There is no block on the Western Railway Road | आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक नाही

आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक नाही

Next

मुंबई : अभियांत्रिकी कामांकरिता रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १४ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यानच्या सर्व लोकल सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावर मात्र कोणत्याही प्रकारचा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर सुटणाºया सर्व उपनगरीय सेवा दिवा आणि परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल परळ स्थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. परळ स्थानकापासून सर्व लोकल पुढे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने शेवटच्या स्थानकांवर पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सुटणाºया डाऊन मार्गावरील जलद लोकल निर्धारित थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

कुर्ला-पनवेल विशेष लोकल
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा ते वाशी/ बेलापूर / पनवेलच्या दिशेने जाणाºया लोकल सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/अंधेरीच्या दिशेने एकही लोकल धावणार नाही. पनवेल/बेलापूर/वाशीवरून सकाळी ९.५३ वाजल्यापासून ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाºया सर्व लोकल तसेच अंधेरी/वांद्रेवरून सकाळी १०.४५ वाजल्यापासून सायंकाळी ०५.०९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाºया सर्व उपनगरीय लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात कुर्ला फलाट क्रमांक ८ वरून कुर्ला-पनवेल विशेष लोकल चालविण्यात येतील.

मेल/पॅसेंजरवरही परिणाम
ब्लॉक काळात ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीचा प्रवास दिवा स्थानकापर्यंतच थांबवण्यात येतील. ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून सुटेल. ५०१०३ गाडीच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्यात येईल. ही गाडी दादरहून दुपारी ३.४० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०४.०६ वाजता पोहोचेल तर ०४.१३ वाजता दिवा स्थानकावर पोहोचेल. ब्लॉक काळात दादर स्थानकावर येणाºया मेल आणि एक्स्पे्रसदेखील २० मिनिटे उशिराने धावतील.

Web Title: Megablocks on the Harbor, Harbor Road today; There is no block on the Western Railway Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.