कल्याण ते ठाणे, ठाणे ते पनवेल मार्गावर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:47 AM2019-07-13T05:47:32+5:302019-07-13T10:28:01+5:30

पश्चिम मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम आणि पनवेल ते वाशी मेगाब्लॉक

Mega Blocks from Kalyan to Thane, Thane to Panvel | कल्याण ते ठाणे, ठाणे ते पनवेल मार्गावर मेगाब्लॉक

कल्याण ते ठाणे, ठाणे ते पनवेल मार्गावर मेगाब्लॉक

googlenewsNext

मुंबई : रविवारी तिन्ही मार्गांवर रेल्वे रुळांची देखभाल, ओव्हर हेड वायरची दुरुस्ती यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे, पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम, हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी, ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणे यादरम्यान मेगाब्लॉक आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक आहे. यावेळी कल्याण ते ठाणेदरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद लोकल धिम्या मार्गावरून चालतील. कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद लोकल सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत संबंधित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा येथे थांबा घेणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम स्थानकांदरम्यान विरार दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत जम्बो ब्लॉक आहे. यादरम्यान विरार दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असल्याने महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर लोकल थांबा नसेल.

सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडील लोकल रद्द होतील. यादरम्यान पनवेल ते अंधेरी सेवा रद्द केली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पनवेल ते ठाणे आणि सकाळी ११.१४ ते ३.२० पर्यंत ठाणे ते पनवेल लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते वाशी/ नेरूळ लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील. सकाळी ११ ते दुपारी ३.३२ पर्यंत बेलापूर ते खारकोपर आणि सकाळी ११.३० ते सायंकाळी ४ पर्यंत खारकोपरहून सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

 

Web Title: Mega Blocks from Kalyan to Thane, Thane to Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.