मध्य तसेच हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:28 AM2018-12-15T06:28:54+5:302018-12-15T06:29:31+5:30

सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी ते भायखळा धिम्या मार्गावर लोकल सेवा ठप्प

Mega Blocks on Central and Harbor Routes tomorrow | मध्य तसेच हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य तसेच हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या मशीद स्थानक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडील पादचारी पुलाचे ३ गर्डर १४० टन क्रेनद्वारे बसविण्यात येणार आहेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा अप - डाऊन धिम्या तसेच जलद मार्गावर सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. तर, सीएसएमटी आणि वडाळा रोड अप - डाऊन हार्बर मार्गावर १० वाजून ३० मिनिटांपासून ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी ते भायखळा (धिमा मार्ग) व सीएसएमटी ते वडाळा दरम्यान एकही लोकल धावणार नाही.

सीएसएमटी येथून डाऊन धिम्या मार्गावर कल्याणसाठी सकाळी १० वाजून १४ मिनिटांनी व भायखळा येथून १० वाजून २२ मिनिटांनी सुटणारी लोकल शेवटची असेल. डाऊन हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून पनवेलसाठी रविवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सुटणारी व वडाळा रोड येथून १० वाजून २८ मिनिटांनी सुटणारी लोकल शेवटची असेल. मध्य रेल्वेच्या अप धिम्या मार्गावर भायखळा येथून सकाळी ९ वाजून ५० मिनिटांची आणि सीएसएमटीकडे सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांची शेवटची गाडी असेल. अप हार्बर मार्गावरील वडाळा येथून सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांनी सुटणारी आणि सीएसएमटीवर सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पोहोचणारी शेवटची गाडी असेल.
ब्लॉकदरम्यान सॅण्डहर्स्ट रोड व मशीद स्थानकांत कोणतीही लोकल थांबणार नाही. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावर सीएसएमटी आणि वडाळादरम्यानची वाहतूक पूर्णत: बंद राहील. अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या लोकल भायखळा, सीएसएमटी स्थानकांच्या दरम्यान जलद मार्गावर धावतील. वडाळा रोड ते पनवेल आणि वडाळा रोड ते वांद्रे/ गोरेगाव यांच्या दरम्यान १५ मिनिटे गाड्या उशिराने धावणार आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल.

Web Title: Mega Blocks on Central and Harbor Routes tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.