भाईंदरमधील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 09:10 AM2024-02-28T09:10:37+5:302024-02-28T09:11:34+5:30

आज सकाळी भाईंदर येथील आझादनगर झोपडपट्टीला आग लागल्याची घटना समोर आली.

Massive fire breaks out in Azadnagar slum in Bhayander, many injured | भाईंदरमधील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, अनेक जण जखमी

भाईंदरमधील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, अनेक जण जखमी

मुंबई येथील भाईंदरमध्ये आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे ५ वाजता ही आग लागली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, सध्या आघीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीचे लोट अनेक अंतरावरुन दिसत आहेत.

या आगीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आगीत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Massive fire breaks out in Azadnagar slum in Bhayander, many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.